दीपक गायकवाड
स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतलेला प्रत्येक नवउद्योजक सुरुवातीला यशाचे स्वप्न पाहतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो. मात्र अनेकदा सुरुवातीला खुणावणाऱ्या संधीचे अचानक आव्हानांमध्ये रूपांतर होते.
व्यावसायिक खर्च, ग्राहकांची संख्या, कर्मचाऱ्यांचा पगार, कुटुंबातून पाठिंबा नसणे आणि मानसिक-शारीरिक ताण यांमुळे नवउद्योजक अक्षरशः खचतो. उद्योजकतेच्या या प्रवासात योग्य मार्गदर्शन, संयम आणि सहसंस्थापकांशी सामंजस्य राखण्याची गरज असते. त्यामुळे अपयश पचवून पुढे जाणाऱ्या उद्योजकांना समाजाने ‘रोल मॉडेल’ मानायला हवे.