(Marathi article about How world war should not to be happen)
साप्ताहिक सकाळच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी त्यांच्या अ वर्ल्ड विदाऊट वॉर या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या विवेचनाचा संपादित गोषवारा...
एखाद्या युद्धाच्या बाबतीत सोशल मीडियावर दिसतं किंवा जागतिक वृत्तपत्रांत वाचायला मिळतं ते सगळं खरं असेलच असं नाही, आणि जे खरंच घडतंय ते कुठल्या मीडियामध्ये बघायला मिळेलच असंही नाही.
कोणत्याही युद्धात मूळ कारणाबरोबरच इतर अनेक घटकही कारणीभूत ठरत असतात. समाज माध्यमं आणि वृत्तसंस्थाही या घटकांमध्ये येतात. यासंदर्भात उदाहरणादाखल सांगता येतील असे काही प्रसंग आठवतात.