डॉ. श्रीकांत कार्लेकर हिमालयातील तीन प्रदेश, पहिला मध्य हिमाचल आणि उत्तर बिहार दरम्यान, दुसरा शिलाँग पठार आणि अरुणाचलमधील मिश्मी हिल्स आणि तिसरा काश्मीर खोरे ही भविष्यातील भूकंप आपत्तींची केंद्रे आहेत, असा इशारा संशोधक देतात. .भारत, नेपाळ, भूतान, चीन (तिबेट) आणि पाकिस्तानमध्ये पसरलेला हिमालय हा जगातला सर्वात उंच आणि सर्वात तरुण पर्वत. हा हिमालय अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा साक्षीदार आहे. विशेषतः भूकंप. या भूकंपांनी हिमालयीन प्रदेशाचा नाश केला आहे, मानवनिर्मित पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत आणि आजवर हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. तरीही सर्वात मोठी भूकंप आपत्ती खरे म्हणजे अजून येणे बाकी आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.जागतिक ख्यातीचे अनेक शास्त्रज्ञ गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून असाच इशारा देत आहेत. त्यांना खात्री आहे, की मोमेंट मॅग्निट्युड स्केलवर (Mw म्हणून दर्शविलेला) आठवरील भूकंप उत्तर भारतातील हिमालयात येऊ घातलेला आहे. मात्र तो कधी आणि कुठे धडकणार हे सांगता येत नाही. (मोमेंट मॅग्निट्युड स्केल मोठ्या भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी रिश्टर स्केलपेक्षा अधिक अचूक मानले जाते. ते खडकाच्या एका तुकड्यावरून दुसऱ्या खडकाच्या पुढे सरकताना भूकंप किती शक्तिव्यय करतो याचे मोजमाप आहे.)हिमालयातील तीन प्रदेश, पहिला मध्य हिमाचल आणि उत्तर बिहार दरम्यान, दुसरा शिलाँग पठार आणि अरुणाचलमधील मिश्मी हिल्स आणि तिसरा काश्मीर खोऱ्याचा काही भाग ही भविष्यातील भूकंप आपत्तींची केंद्रे आहेत, असा इशारा संशोधक देतात.भू-भौतिकशास्त्रज्ञ रॉजर बिल्हॅम म्हणतात, की हिमालय हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे भविष्यात मोठा शक्तिशाली भूकंप होऊ शकतो. रॉजर बिल्हॅम हे कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात भूविज्ञानाचे सुप्रतिष्ठित प्रोफेसर आहेत. त्यांनी गेल्या सहस्राब्दीमध्ये हिमालयातील भूकंपांच्या ऐतिहासिक नोंदींचा तपशीलवार अभ्यास केला आहे. त्यांनी जी निरीक्षणे केली आहेत त्यांचा भूकंप प्रक्रियेच्या सध्याच्या आकलनाशी ताळमेळ घालण्याचा ते प्रयत्न करतात. यामुळे अर्थातच त्यांना भविष्यातील धोक्याच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करण्यात मदत होते. .रॉजर बिल्हॅम यांनी डिसेंबर १९९४च्या सुरुवातीलाच उत्तर भारतातील मध्य हिमालयीन प्रदेशावर भूकंप आपत्तीची तलवार लटकत असल्याचे संकेत दिले होते. त्याच महिन्यात, बंगळूरस्थित सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग अॅण्ड कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या विनोद गौर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांसोबत बिल्हम यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीत त्यांच्या प्रस्तावाचा तपशीलवार अहवाल सादर केला होता.हिमालयातील भूकंप ही एक नैसर्गिक आणि नियमित घटना आहे. सुमारे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय भूतबक आणि युरेशियन भूतबक यांच्यातील टकरीतून हिमालय पर्वतरांगा आणि तिबेट पठाराचा जन्म झाला. जसजसे भारतीय भूतबक युरेशियन भूतबकाच्या खाली एकत्र येत राहील, तसतशी पर्वत निर्माणप्रक्रिया चालू राहते. या प्रक्रियेतून निर्माण होणारा ताण भूतबकाच्या सीमेवर साचत राहतो आणि ठरावीक अंतराने बाहेर पडून भूकंपांना चालना देत राहतो.बिल्हॅम यांच्या मते, ७ Mw च्या भूकंपाने तयार झालेल्या ऊर्जेइतकी ऊर्जा तयार होण्यासाठी ६ Mw चे तीस भूकंप व्हावे लागतात आणि ८ Mw च्या भूकंपाने निर्माण झालेल्या ऊर्जेइतकी ऊर्जा निर्माण होण्यासाठी ६ Mw तीव्रतेच्या एक हजार भूकंपांची आवश्यकता भासते. जरी हिमालयात दररोज ४ Mw पेक्षा कमी तीव्रतेचे अनेक छोटे भूकंप होत असले, तरी व्यवहारात फक्त सर्वात मोठ्या भूकंपात भारतीय तबक तिबेट पठाराच्या दक्षिणेकडील बाजूच्या खाली सरकते, असे बिल्हॅम यांनी २०१९मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या संशोधनात लिहिले होते. .वर्ष २०१५मध्ये नऊ हजार लोकांचे बळी घेणारा नेपाळ भूकंप ७.८ रिश्टर स्केलचा होता, तर दोन हजारांवर लोकांचे बळी घेणारा भूजचा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता आणि २००५मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर स्केलच्या काश्मीर भूकंपात जम्मू-काश्मीर तसेच अफगाणिस्तानच्या काही भागांत सुमारे ८० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. हे सर्व ‘मोठे’ भूकंप होते पण अतिसंहारक नव्हते, कारण त्यांची तीव्रता ८ Mw पेक्षा कमी होती.आपत्तींचे भाकीत करण्यात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी भूकंपाचा अंदाज बांधता येत नाही. कोणत्याही शास्त्रज्ञांना आजपर्यंत कधीही मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी करता आलेली नाही. ठरावीक वर्षांच्या आत, विशिष्ट क्षेत्रात, महत्त्वपूर्ण भूकंप होण्याची केवळ शक्यता शास्त्रज्ञ मोजू शकतात. भूकंप नेमका केव्हा आणि कुठे होईल हे सांगता येत नसले आणि तो किती मोठा असेल हेदेखील सांगता येत नसले, तरी भूकंपशास्त्रज्ञ संभाव्यता आणि अंदाज नक्कीच सांगू शकतात.हिमालयातील सर्वात मोठे भूकंप सामान्यतः मुख्य हिमालयन रेट्याच्या बाजूने झाले आहेत. मुख्य हिमालयन रेट्यावर गेल्या १२५ वर्षांत चार मोठे भूकंप झाले आहेत- मध्य-हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे (१९०५), नेपाळ-उत्तर बिहारमध्ये (१९३४), मेघालय-आसाममध्ये (१८९७) आणि अरुणाचल-आसाममध्ये (१९५०). तथापि, हिमालयात असेही काही प्रदेश आहेत जिथे शतकानुशतके मोठे भूकंप झालेले नाहीत. जेव्हा सक्रिय भूतबकाच्या सीमारेषेवर असलेल्या प्रदेशाची कंपन क्षमता कमी होते, तेव्हा ती वादळापूर्वीची शांतता असते. अशा भागात तणाव निर्माण होऊन आणि साचून भविष्यात मोठे भूकंप होतात.भारतीय भूतबक दर शतकात तिबेटच्या दक्षिणेकडील प्रदेशात दोन मीटर खाली सरकते. पण त्याची उत्तरेकडील बाजू सहजतेने सरकत नाही. भूकंप हा या गतीचा अपरिहार्य परिणाम आहे. दर शंभर वर्षांत हिमालयात आठ रिश्टरपेक्षा जास्त तीव्रतेचे मोठे भूकंप होत आहेत. ८.७ रिश्टर इतक्या मोठ्या तीव्रतेचे भूकंप गेल्या दोन हजार वर्षांत इथे अनेकवेळा झाले आहेत. मात्र हिमालयाच्या भूप्रदेशावरचा दबाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेला आठ रिश्टर तीव्रतेचा एकही भूकंप सक्रिय भूतबकाच्या सीमेवर गेल्या ७० वर्षांत झालेला नाही. .हिमालयातील दोन किंवा अधिक प्रदेश लवकरच एका मोठ्या भूकंपामुळे दुभंगले जाणे अपेक्षित आहे. ही केवळ ‘शक्यता’ नसून अशी घटना घडेलच याची खात्री आहे. दुर्दैवाने, ही घटना नेमकी केव्हा घडेल याची अचूक वेळ सांगता येणे शक्य नाही, असे रॉजर बिल्हॅम म्हणतात.दोन हजार किलोमीटर लांबीच्या हिमालयाचा तीन चतुर्थांश भाग, २०१५च्या ७.८ रिश्टर तीव्रतेच्या नेपाळ भूकंपात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या तिप्पट ऊर्जा निर्माण करणाऱ्या, ८.२ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाला सामोरा जाऊ शकतो. यातल्या काही भागात ८.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन तो २०१५च्या नेपाळ भूकंपापेक्षा आठपट जास्त ऊर्जा निर्माण करेल, असे शास्त्रज्ञांना वाटते.बाराव्या शतकाच्या आसपास भारतात झालेल्या भूकंपाप्रमाणे नऊ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपापेक्षाही मोठ्या भूकंपामुळे भविष्यात हिमालय बाधित होऊ शकतो अशी शक्यता असली, तरी संशोधकांच्या मते अशा घटिताची संभाव्यता कमी आहे. याआधी सगळा हिमालय भूकंपाने हादरून गेल्याची घटना१३व्या आणि १५व्या शतकादरम्यान घडली होती.भविष्यात होणाऱ्या हिमालयीन भूकंपाचा थेट परिणाम म्हणून नद्या आपला मार्ग बदलणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. १९३४च्या ८.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात गंगेच्या मैदानात नद्यांजवळ झालेल्या गाळाच्या द्रवीकरणामुळे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक इमारती बुडाल्या आणि त्यांची पुनर्बांधणी करावी लागली. त्या भूकंपामुळे १०० किलोमीटर परिसरातले रस्ते आणि रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाले. भूस्खलनामुळे काही नद्या रोखल्या गेल्या. त्यामुळे त्यानंतरच्या आठवड्यात विध्वंसक पूरही आले होते. .गेल्या वर्षी जानेवारी ते जून या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाच्या ३२ घटना घडल्या. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ ते ५.४ इतकी होती. हिमालय भूकंप प्रक्रियेबाबतीत अतिसंवेदनशील असल्याचे भूकंपांची ही संख्या दाखवते. यांपैकी अनेक भूकंप त्यांच्या कमी तीव्रतेमुळे लोकांच्या लक्षात येत नसले, तरी कोणत्याही क्षणी इथे मोठा भूकंप येऊ शकतो याची पूर्वसूचनाच निसर्ग अशा धक्क्यांमार्फत देत असतो. हिमालय हा प्रामुख्याने भूकंपाच्या क्रमांक पाचच्या आणि चारच्या म्हणजे अतितीव्र आणि तीव्र भूकंप पट्ट्यात येतो.हिमालयाच्या परिसरावर काम करणाऱ्या बिल्हम यांच्या निरीक्षणांनुसार, भूकंप जागरूकतेच्या संदर्भाने स्थानिक प्रशासनाने काही कार्यक्रम आयोजित करण्याव्यतिरिक्त येऊ घातलेल्या आपत्तीचे संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी काहीही केलेले नाही. जमिनीचा कठीणपणा किंवा उंच-सखलपणा किंवा बांधकाम नियमांची पर्वा न करता या भागातील बांधकाम व्यवसाय अव्याहतपणे सुरू आहे, असेही निरीक्षण ते नोंदवतात.भूकंपाच्या संभाव्य संकटाचा फटका ज्या भागाला बसण्याची शक्यता आहे, त्यात श्रीनगरसह काश्मीर खोऱ्याचा समावेश असेल. भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन जी विभंग पातळी (Fault Plane) तयार होईल त्यावर ३०० किलोमीटरच्या लांबीवर घसरण झाल्यास नऊ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे. बांधकाम नियमांची पायमल्ली आणि प्रदेशातील लोकसंख्या पाहता ह्या आपत्तीत मोठी मनुष्यहानी होऊ शकते, असे बिल्हॅम यांचा अभ्यास सांगतो.या प्रदेशातील भूकंपाची जोखीम आणि असुरक्षिततेच्या इतिहासाच्या उत्तम प्रकारे केलेल्या नोंदी उपलब्ध असूनही प्रचलित इमारत बांधकाम पद्धतींमध्ये भूकंप-प्रतिरोधक आराखड्यांचा आजही समावेश केलेला दिसत नाही, असे २०१८मध्ये काश्मीर खोऱ्यातील भूकंपाचा धोका आणि संभाव्यतेचा आढावा घेतला तेव्हा आढळून आले होते. यामुळे खोऱ्यातील दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये भूकंप झाल्यास स्थानिक पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.भूकंपप्रवण भागातील जलाशयांच्या बांधकामाबाबतही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जलाशयातील पाण्याचे वजन भूपृष्ठावरील दाब आणि ताण-वितरणामध्ये बदल घडवून आणू शकते व त्यामुळे खडकात आधीच अस्तित्वात असलेले विभंग पुन्हा सक्रिय होण्याची किंवा नवीन विभंग निर्माण होण्याची शक्यताही असते.जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या १९ जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहेत. चिनाब खोऱ्यातही आणखी सहा प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प पूर्ण केल्याने या प्रदेशात धरणांचे जाळे निर्माण होईल आणि त्यामुळे भूपृष्ठावरील विभंग रेषांवरचा दबाव वाढेल आणि भूकंपाचा धोकाही वाढेल, याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधतात.ऑगस्ट २०२२मध्ये काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांपेक्षा कमी कालावधीत १३ भूकंप झाले. किश्तवार भूभ्रंश (Fault) या जलाशयांच्या खालून किंवा त्यांच्या जवळून जातो. त्यामुळे या प्रदेशात वाढलेल्या भूकंप हालचालींमागे मोठ्या धरणांचे बांधकाम हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे .हिमालय भविष्यातील मोठ्या भूकंपाचे संभाव्य स्थान म्हणून असला, तरी हिमालयात वैज्ञानिक निरीक्षण प्रणालीचा अभाव आहे. हिमालय हा पृथ्वीवरील सर्वात कमी निरीक्षणे झालेला, अधिक जोखीम असलेला भूकंप प्रदेश आहे, असे एशियन सेस्मॉलॉजिकल कमिशनचे माजी अध्यक्ष भूकंपशास्त्रज्ञ परमेश बॅनर्जी यांनी २०१९मध्ये एका संशोधन निबंधात निदर्शनास आणून दिले होते. जपान, उत्तर अमेरिकेचा पश्चिम किनारा, इंडोनेशियाची बेटे आणि दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा यांसारख्या पृथ्वीवरील इतर सर्व सक्रिय आणि आपत्ती प्रवण सक्रिय प्रदेशांच्या तुलनेत, हिमालय पर्वतरांगांमध्ये भूकंपविषयक नेटवर्क तसेच गुरुत्वाकर्षण मोजमाप आणि जीपीएस मॉनिटरिंग नेटवर्क्स सगळ्यात कमी आहेत! डेहराडूनच्या वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या शास्त्रज्ञांनीही या संशोधनाला पुष्टी दिली आहे.(डॉ. श्रीकांत र्कालेकर भूविज्ञान अभ्यासक आहेत.)-----------------------.Love Story : ५६ वर्षांची मी आणि ३६ वर्षांचा तो..! रिटायरमेंटच्या वयात सुरू झाली मुंबईची प्यारवाली लव्ह स्टोरी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.