सम्राट कदम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात एरवी नाट्य, कला, संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी असते. पण, १९८९मधील चैत्र महिन्याचा पहिलाच दिवस (वसंत संपात दिन) होता. या दिवशी केंद्रात एकत्र आले होते ते खगोलशास्त्रज्ञ! कारणही तसेच होते.
‘आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र’ म्हणजे ‘आयुका’चा तो स्थापना दिवस. केवळ आंतरविद्यापीठीय केंद्र म्हणून मर्यादित न राहता भारतीय बनावटीच्या प्रयोगशाळा, दुर्बिणी, उपग्रह करण्याचा दृढ निश्चित शास्त्रज्ञांनी केला.
आता ३५ वर्षानंतर ‘आयुका २.०’ उभारण्यात येत आहे. त्याच वेळी ‘इस्रो’च्या मदतीने आयुकाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर सीमोल्लंघन केले आहे. विश्वरूप दर्शनासाठी आयुकाच्या भरारीची ही यशोगाथा...