नव्या तंत्रज्ञानामुळे मानवजातीच्या अस्तित्वावर गदा येण्याची शक्यता नाही असा शंभर टक्के दिलासा मिळाला, तरी त्या तंत्रज्ञानावरील आक्षेप कायम राहतो. मानव तगला, जगला, जिवंत राहिला तरी त्याच्यातील मानवत्वच शिल्लक राहणार नसेल तर असे तंत्रज्ञान काय कामाचे? मानवत्वाशिवाय मानव काय कामाचा? मानव जो काही आहे तो त्याच्यामधील मानवत्वामुळे आहे. ते गेले तर नैतिकदृष्ट्या मानव अस्तित्वात असला काय आणि नसला काय, असा हा विचार आहे.