वर्षा सुनील साठे (खरे)छोटासा सनबर्ड त्याच्या आवाजानं, हालचालीनं आणि चमकणाऱ्या रंगानं नजर खिळवून ठेवतो. तारांवर बसून जोरजोरानं ओरडतो. रेन ट्रीची गुलाबी फुलं आणि सनबर्डची लगबग बघायला मजा येते. .विलायती शिरीष... खूप मोठं झाड... काळ्या काळ्या फांद्यांचा भरपूर पसारा... त्यामुळे झाडाला आलेला एक ठरावीक आकार... खूप मोठी कॅनॉपी अशी त्या झाडाची ओळख! एका रिकाम्या प्लॉटमध्ये अगदी दिमाखात उभा आहे हा वृक्ष. छान वाटतं त्याच्याकडे बघताना. देखणा, मोठा, महाकाय वृक्ष. शहरातल्या इतर बारीकसारीक झाडांमध्ये तर अजूनच उठून दिसतो.आम्ही उज्ज्वल नगरला राहायला आलो, तेव्हा तो अचानकच माझ्यासमोर आला. घराच्या खिडक्यांमधून, बाल्कनीतून खूप सुंदर दिसे. पालवी पण फार नेटकी आणि देखणी. गंमत अशी की रात्री पानं मिटून जातात. या झाडाच्या पालवीतून झावळ झावळ ऊन येई, प्रखर नाही. त्यामुळे रात्री चंद्र दिसणार नाही असं मला वाटलं होतं. पण रात्री पानं मिटल्यामुळे चंद्र काळ्या काळ्या फांद्यांच्या मागून स्पष्ट दिसतो.पहिल्याच पावसाळ्यात मात्र त्याची वाढ फार प्रचंड जाणवली. पण मला मोठ्या फांद्या तोडायला नाही आवडत. इकडून तिकडून माझ्या खिडकीवर, बाल्कनीत त्यांचं आक्रमण सुरू झालं. बाई गंऽऽ कसं आवरायचं या राक्षसाला. त्याला ‘महाकाय राक्षस’ हाच शब्द योग्य वाटला. माझ्या मैत्रिणीसुद्धा त्याला ‘मॉन्स्टर ट्री’ म्हणायच्या. थायलंडमध्ये याला चामचुरी याक (Chamchuri Yak) म्हणतात. याक म्हणजे यक्ष. A Mythical Demon. या झाडाच्या अवाढव्य आकारामुळे त्याला राक्षस म्हणतात. वारा-वादळात त्याच्या फांद्या इतक्या आपटतात बाल्कनीत की खोपेतून खाडकन उठत असू. पण नागपूरच्या उन्हाळ्याची आठवण होऊन मी त्या फांद्या न कापता त्याची सावली राहू दिली. .या झाडावर एकाही पक्षानं घरटं बांधलेलं दिसलं नाही. भारतीय झाड नाही म्हणून पक्षी घर बांधत नाही व राहत नाही, म्हणून भारतीय झाडं लावा असे सगळेजण म्हणतात. पण या झाडावर पक्षी विसाव्याला मात्र येतात. दोन-तीन मैना गप्पा ठोकायला येतात. त्यांचा हा सकाळचा फेरफटका विसावा पॉइंट असावा. फांद्यांवर बसून नुसती कलकल. ‘अगं तुला काय सापडलं, मला अळी...’ अशा गप्पा असाव्यात त्यांच्या. बायका मॉर्निंग वॉकला जातात आणि तिघी-चौघी भेटल्या की बसून गप्पा मारतात, तसं काहीसं.या झाडांच्या फांद्यांमध्ये बुलबुल शिवाशिवीचा खेळ खेळतात. कधीकधी एकदुसऱ्याला मागं टाकून पुढं म्हणजे आऊट. त्यांचीही माना वाकवून होणारी बडबड मोठी मजेशीर. हे सगळे रेन व्हेंटेड बुलबुल आहेत. बुलबुलव्यतिरिक्त किंगफिशर, शिक्रा, गोल्डन ओरिओल, ग्रे हॉर्नबिल, तांबट असे कितीतरी पक्षी मी या झाडामुळे पाहिले.या झाडाला वसंतात गुलाबी रंगाची फुलं येतात. आम्ही चंद्रपूरला असतानाही पाहिली होती अशीच शिरिषाची झाडं. तीसुद्धा अजस्र, पण त्यांना पोपटी पांढरी फुलं येतात. खूप छान वास येतो. हे वृक्षही खूप मोठे होतात आणि असे मोठे वृक्ष मी फक्त कॉलनीतच पाहिले, रस्त्यावरती खूप मोठे झालेले नाही पाहिले. या शिरिषाच्या झाडावर खूप पक्षी, मुंगळे, माशा, मधमाश्या, किडे इतके आहेत की त्या झाडाची स्वतःची छान छोटीशी इकोसिस्टीमच दिसते.या झाडाची आणि रेन ट्रीची पानंही सारखीच. हा आणि शिरीष म्हणजे रेन ट्री, दोघेही Fabaceae फॅमिलीचे. रेन ट्री (Samanea Saman) दक्षिण अमेरिकेतला, तर शिरीष (Albizia Lebbeck) उष्णकटिबंधीय नैऋत्य आशियातला. .शिरिषाची ओळख अगदी लहानपणापासूनची. आम्ही राहत होतो, तिथल्या धंतोलीच्या पार्कात होते दोन मोठे वृक्ष. फुलले की इतका सुंदर सुवास दरवळे. ती फुलं हातात घेऊन बघायला मजा येई. मग हळूच गालावर, मानेवर फिरवायची. मोठ्या मजेशीर गुदगुल्या होत असत. मग लगेच मैत्रिणींवर प्रयोग. अगं एऽऽऽ ईऽऽऽ वगैरे आरडाओरडा. मग खिऽऽखि खिदळणं.याच्या शेंगासुद्धा पिवळसर सोनेरी रंगाच्या; सुंदर दिसतात आणि खुळखुळ वाजतात. एक वेळ अशी असते, की झाडभर शेंगा लागतात. त्या वाऱ्याबरोबर मस्त संगीत तयार करतात. लहान असताना शाळेत जाण्याच्या रस्त्यावर होती ही झाडं. घरी येताना रहदारी नसे व उन्हात तर फारच एकटं वाटायचं आणि त्यात हे खुळखुळ खुळ खुळ एकसाथ वाजून एक भयंकर वातावरण तयार होत असे. अश्शी भीती वाटे, की सुसाट पळत सुटायचं घरी. पुढच्या चौकात आल्यावरचं हुश्श वाटायचं.तर असा हा विलायती शिरीष म्हणजे रेन ट्री माझ्या बाल्कनीच्या बाहेर पानोपान फुलतोय. किती फुलू आणि किती नाही! मोहक दिसतं सगळं. मध्यंतरी एका वेगळ्याच पक्ष्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि तोसुद्धा अगदी मोठ्यानं. जाऊन पाहिलं तर एक छोटासा काळपट चमकणारा पक्षी फुलाफुलांवर उडून मध पीत होता. मधूनच येणाऱ्या उन्हाच्या तिरपीत त्याचं अंग चमचममायचं. फुलात सतत चोच खुपसून व मध टिपणं सुरूच होतं. याच्या याच ॲक्शनमुळे याला फुलचोखे किंवा फुलटोचे अशी समर्पक नावं असावीत. चार-पाच पक्षी सहज असतील. सकाळी सकाळी त्यांची फीस्ट सुरू असते. छोट्या चिमण्यांच्या आकाराचे पक्षीही दिसले. त्या फिमेल असणार. मध चोखण्यासाठी फारच लगबग सुरू असते सगळ्यांची... कुठे जाऊ मी, किती नाचू. .हे सगळं पाहून मला पलक्कडची आठवण आली. हा सगळा जंगलाचाच भाग आणि खूप सुंदर फुल होती बिल्डिंगच्या आवारात. तिथं मी रंगीबेरंगी, लांब चोचीचे छोटेसे पक्षी पाहिले. खूप सुंदर होते. त्यांच्याकडे बघतच राहिले. पण तेव्हा मी पक्ष्यांविषयी वाचन केलेलं नव्हतं, त्यामुळे हे कोणते पक्षी आहेत ते मला समजेना. बरं बीबीसी अर्थ आणि नॅशनल जिओग्राफिकनं हमिंग बर्ड्स दाखवून दाखवून खूपच पॉप्युलर केलेत. मला पहिल्यांदा तेच आहेत वाटलं. पण दोघांच्या ॲक्शनमध्ये फरक दिसला आणि तो विषय तिथंच राहिला.पण आता जेव्हा सनबर्ड किंवा शिंजीर पाहिला, तेव्हा समजलं की हमिंग बर्ड व शिंजीर वेगळे आहेत. हमिंग बर्ड्स अमेरिकेतले, हनी इटर्स ऑस्ट्रेलियातले आणि सनबर्ड आशियातले. (Resemblance is due to convergent evolution brought about by a similar nectar feeding lifestyle -इति गुगल.) पर्पल सनबर्ड हा सगळ्यात सहज दिसणारा कॉमन सनबर्ड आहे. पण पलक्कडला पाहिलेले इतर रंगीबेरंगी सनबर्डही खूप सुंदर होते.तर असा हा छोटासा सनबर्ड त्याच्या आवाजानं, हालचालीनं आणि चमकणाऱ्या रंगानं नजर खिळवून ठेवतो. तारांवर बसून जोरजोरानं ओरडतो. असं वाटतं एवढासा जीव, पण आवाज पाहा. निसर्गाची किमया, दुसरं काय! तुम्हीही पाहा, फुलांवर भिरभिरताना नेहमी दिसतो. रेन ट्रीची गुलाबी फुलं आणि सनबर्डची लगबग बघायला मजा येते.----------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.