राजेश काळे, राळेगाव, जि. यवतमाळयवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर रावेरी गावात वैशिष्ट्यपूर्ण सीता मंदिर आहे. .यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरी या गावात दुर्मीळ असे सीता मंदिर आहे. रावेरी परिसर दंड कारण्याचा भाग समजला जातो. श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर सीतेला जेव्हा वनवास भोगावा लागला तेव्हा ती रावेरीलाच होती, असे सांगितले जाते. या गावातच लव-कुश यांचा जन्म झाला, असे मानतात. लव-कुश आणि हनुमान यांच्यात अश्वमेधाच्या घोड्यावरून झालेले युद्ध येथेच झाले, अशी कथा आहे.विदर्भातील प्रसिद्ध तेरा फूट उंचीची हनुमान मूर्ती असलेले मंदिर येथेच आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधीसुद्धा याच परिसरात आहे. रावेरीतून वाहणारी रामगंगा ही रामायणातील तमसा नदी असे मानले जाते. मुलांच्या जन्मानंतर सीता गावकऱ्यांना गहू मागण्यासाठी गेली असता ग्रामस्थांनी ते दिले नाहीत. तेव्हापासून रावेरीत गहू पिकत नसल्याचे सांगितले जाते..शेतकरी नेते शरद जोशी यांनी १० नोव्हेंबर २००१ रोजी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय महिला अधिवेशन रावेरी येथे घेतले होते. शरद जोशी यांनी मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा केला. मंदिराचे बांधकाम करताना त्याचे प्राचीन स्वरूप कायम राहील याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले होते. मंदिर बांधण्यासाठी लातूरमधील दहा कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत होते.नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून रावेरीला शिळा आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर नागरिकांनी वर्गणी काढून मंदिराचे आणि परिसराचे सुशोभिकरण केले. रावेरी येथे सीता नवमीला तसेच हनुमान जयंतीला मोठे कार्यक्रम होतात. अनेकजण वर्षभर येथे स्वयंपाक आणतात. यवतमाळ-राळेगाव अंतर ४० किलोमीटर असून, राळेगाव येथून तीन किलोमीटर अंतरावर रावेरी गाव आहे. नागपूरहून येताना कळंबवरून ३० किलोमीटर अंतरावर रावेरी आहे. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय नाही.(राजेश काळे दै. सकाळचे तालुका बातमीदार आहेत.)------------------