विघ्नहर्त्या गजाननाच्या स्वयंभू मानल्या जाणाऱ्या प्राचीन मूर्तींचे दर्शन घडविणारी आठ मंदिरे म्हणजे अष्टविनायक. दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात. अष्टविनायकांतील प्रत्येक गणेश मूर्तीला आणि मंदिराला स्वतंत्र इतिहास व महत्त्व आहे. .अष्टविनायकांपैकी पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री) पुणे जिल्ह्यात, दोन (महड, पाली) रायगड जिल्ह्यात आणि एक (सिद्धटेक) अहमदनगर जिल्ह्यात आहे. यातील सिद्धटेक येथील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.मोरगावचा मयुरेश्वरअष्टविनायकातील पहिला गणपती. कमंडलू (कऱ्हा) नदी तीरावरील मोरगावचा मोरेश्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे आद्यपीठ. ‘भूस्वानंदभुवन’ हे या क्षेत्राचे मूळ नाव. मोरासारखा त्या भूमीचा आकार म्हणून ‘मयूराकार भूमी’ झाली, मयूरग्राम-मोरगाव. ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती, सूर्य या श्रेष्ठ देवता. या पंचकाची ही तपोभूमी. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन आदिशक्तीस्वरूप महागणपतीने त्यांना दर्शन देऊन या तपःस्थळी, मयूरक्षेत्री राहण्याचे मान्य केले. या पंचदेवतांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली. महाभक्त मोरया गोसावी यांनी या मयुरेश्वर गणपतीची अनन्य उपासना केली.महाराष्ट्रातील इतर शिवकालीन मंदिरांपेक्षा हे मंदिर वेगळे आहे. चारही बाजूंनी चार मिनार आहेत. या मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात झाली. मंदिराच्या आतल्या बाजूस सभामंडप आहे. तटाच्या आत आठ कोपऱ्यात मुद्गलपुराणात वर्णिलेल्या गणेशाच्या आठ प्रतिमा आहेत. सभामंडपानंतर गाभारा लागतो. गाभाऱ्यातील मयुरेश्वर गणेशाची मूर्ती नयनरम्य आहे. या मुख्य मूर्तीच्या पुढ्यात मूषक व मयूर आहेत. मयुरेश्वराच्या या मूर्तीसंबंधी असे सांगतात, की ही मूळ मूर्ती नाही. मूळ मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न अशा अणूंची असून दृश्य मूर्तीच्या मागे अदृश्य आहे. ती प्रथम ब्रह्मदेवांनी स्थापन केली होती; पण सिंधू असुराने तिचा विध्वंस केल्यानंतर ब्रह्मदेवांनी दोन वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत या स्थानी आले तेव्हा मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये, म्हणून त्यांनी मूळ मूर्तीला तांब्याच्या भक्कम पत्र्याने बंदिस्त करून तिला लागूनच आजची दुसरी मूर्ती नित्यपूजेकरिता बसविली.सिद्धटेकचा सिद्धिविनायकभीमा नदीच्या तीरावरील हे मंदिर पेशवेकालीन आहे. मंदिराचा गाभारा देवी अहल्याबाईंनी बांधला आहे. अष्टविनायकांपैकी ही एकच मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मधू आणि कैटभ या दोन पराक्रमी दैत्यांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यावयास सुरवात केली. तेव्हा ब्रह्मदेव या दैत्यांच्या नाशार्थ विष्णूकडे गेले. विष्णूंनी त्या दैत्यांशी बराच काळापर्यंत युद्ध केल्यानंतरही ते हरले नाहीत. तेव्हा विष्णू साहाय्याची याचना करण्याकरिता शंकरांकडे गेले. विष्णूंनी शंकरांना त्या दोन दैत्यांची हकिगत सांगितली. तेव्हा शंकरांनी त्यांना श्री विनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता, असे म्हणून विनायकाला प्रसन्न करून घेण्याचा मंत्र दिला. विष्णू या मंत्राचे अनुष्ठान करण्याकरिता पवित्र क्षेत्र शोधीत एका टेकडीवर गेले आणि तेथे त्यांनी या मंत्रजपाने विनायक देवतेला प्रसन्न करून घेतले. विनायकाने इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर विनायकाचे देवालय उभे केले आणि त्यात श्री गजाननाची मूर्ती स्थापली. विष्णूंना येथे सिद्धी मिळाली म्हणून या क्षेत्राला सिद्धक्षेत्र किंवा सिद्धटेक व विनायकाला सिद्धिविनायक असे नाव पडले. विष्णूच्या तपश्चर्येने आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्याने पवित्र झालेली अशी ही भूमी आहे. येथील विनायकाच्या मूर्तीची सोंड उजवीकडे झुकलेली असल्यामुळे हे दैवत कडक मानतात.थेऊरचा चिंतामणीया मंदिराचे बांधकाम शिवकालीन आहे. श्री धरणीधर महाराज यांनी सन १७४०मध्ये घडीव दगडातील हेमाडपंथी मंदिराची उभारणी केली. मुख्य गाभाऱ्यात चिंतामणीची पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. सृष्टीनिर्माता ब्रह्मदेवाच्या चित्तात ‘थर्व’ म्हणजेच चंचलता निर्माण झाल्यामुळे सृष्टी घडविण्यात अडथळे- विघ्न निर्माण होऊन काम ठप्प व्हायची आपत्ती ओढवली. तेव्हा त्यानी ‘श्रीगणेशः शरणम्।’ मानून कठोर तपस्या केली. ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर होऊन स्थावर - स्थैर्य लाभले म्हणून त्याने या क्षेत्राचे नामकरण केले ‘स्थावरक्षेत्र.’ मराठीत त्याचे थेऊर आणि समस्त चिंता नाहीशा करणारा येथील विनायक झाला ‘चिंतामणी - विनायक.’ श्रीमंत माधवराव पेशवे या चिंतामणीचे निःसीम उपासक.थेऊर गणपती हे अष्टविनायकांपैकी तिसरे स्थान. या स्थानाला महत्त्व आलेल्या कथेपैकी आणखी एक म्हणजे, ऋषिपत्नी अहल्येशी कपटाचरण करून निंद्यकर्म केल्याबद्दल गौतम मुनींनी इंद्राला सर्वांगाला क्षते पडतील, असा शाप दिला. तेव्हा इंद्राने ऋषींचे पाय धरून क्षमा मागितली. ऋषींनी मग त्याला श्रीगणेशाची षड्क्षरी मंत्राने तपपूर्ती होऊन आराधना करून शापाच्या परिणामातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला. इंद्राने ज्या स्थानी ही तपश्चर्या करून शुद्धी व मुक्ती मिळविली आणि तो चिंतामुक्त झाला त्या स्थानी श्रीगणेशाची स्थापना करून तिथल्या सरोवराला चिंतामणी असे नाव दिले. चिंचवडचे मोरया गोसावी यांनी या थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्चर्या केली होती मोरया गोसावींना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. येथील श्रीचिंतामणींची मूर्ती डाव्या सोंडेची असून, पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे.रांजणगावचा महागणपतीत्रिपुरासुराने गजाननाकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सर्व जग पादाक्रांत करण्याचे ठरवून स्वर्गावर स्वारी केली व देवांच्या सैन्याची दाणादाण उडवून स्वर्ग, पाताळ सर्व हस्तगत केले. सर्व जग त्या असुराच्या त्रासाने भयग्रस्त झाले.याला उपाय म्हणून नारदांनी देवांना गजाननाची उपासना करण्याचा उपदेश केला. देवांनी आठ श्लोकयुक्त स्तोत्राने गणेशाची स्तुती केली. ते स्तोत्र ‘संकटनाशनस्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. शंकरांनी ज्या क्षेत्रात तपश्चर्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळविला ते हे क्षेत्र. येथे त्यांनी मणिपूर नावाचे नगर वसविले तेच आजचे रांजणगाव.श्रीमंत माधवराव पेशवे लढाईवर जाताना या देवस्थानाचे दर्शन घेऊन मगच पुढील पाऊल उचलत असत, असे सांगितले जाते. पेशव्यांनी सन १७९०मध्ये स्वयंभू मूर्तीभोवती दगडी गाभारा बांधून अन्याबा देव यांना वंशपरंपरागत देवस्थानची पूजा करण्याची सनद दिली. देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळात सभामंडप आहे. मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे..लेण्याद्रीचा गिरिजात्मजअष्टविनायकातील सहावा गणपती गिरिजात्मज. गिरिजा म्हणजे पार्वती. तिचा आत्मजः म्हणजे पुत्र म्हणून हा गिरिजात्मज. टेकडी खोदून निर्माण केलेल्या या तीर्थक्षेत्री आजूबाजूला बौद्ध लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत या लेण्या कोरलेल्या आहेत. हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.हिमालय कन्या पार्वतीने सुपुत्र व्हावा म्हणून या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून तिने मातीची जी बालमूर्ती केली होती, त्यातूनच तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गजानन बालरूपात प्रकट झाले, अशी कथा आहे. गणेशाच्या सर्व बाललीला याच डोंगराच्या परिसरात झाल्या. मयूर हा वाहन झाला तोही येथेच.कुकडी नदीच्या परिसरातील या देवालयातील मूर्ती रेखीव नाही. एका कोरीव कोनाड्याच्या मध्यभागी गणेशप्रतिमा आहे. या देवाच्या डाव्या-उजव्या अंगांना लहान ओट्यांवर मारुती, गणपती व शंकर अशा मूर्ती आहेत. या मूर्ती मात्र नंतरच्या काळातल्या असाव्यात.या ठिकाणी देवाची पाठीकडूनच पूजा होते असा समज आहे, कारण त्याचे मुख उत्तर बाजूला आहे, असे म्हणतात.ओझरचा विघ्नहरविघ्नहराचे मंदिर पेशवेकालीन आहे. बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या अष्टविनायक स्थानी विघ्नासुराने सत्कर्म करणाऱ्यांना अतिशय पीडा दिली. तेव्हा देवांनी पराशर ऋषींना पुढे करून या विघ्नासुराचे पारिपत्य करण्याकरिता गणपतीची आराधना केली. पराशर ऋषींना श्री गणेश प्रसन्न झाला तो याच ठिकाणी, असे पुराणात वर्णिले आहे.त्याने पराशर ऋषींचा पुत्र होऊन विघ्नासुराशी मोठे युद्ध केले व त्याला शेवटी शरण आणले. विघ्नासुराने भक्तिपूर्वक गणपतीचे स्तवन करून देवाला ‘विघ्नहर’ असे नाव घ्यावे, अशी विनंती केली आणि गणपतीने ती मान्य केली.श्रीविघ्नेहराचे देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. गाभाऱ्यात चारही बाजूंना छोटे कोनाडे असून, त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत. श्रींच्या डावीकडे भिंतीवर कमलावर आरूढ अशी लक्ष्मी व उजवीकडे श्री विष्णूचे चित्र रेखाटलेले आहे. देवालय चारी बाजूंनी दगडी तटांनी बंदिस्त आहे. मुख्य देवाच्या मूर्तीसमोरच मंडप आहे.देवळाचा घुमट कलात्मक असून, त्यावर शिखर व सोनेरी कळस आहे. प्रमुख देवळात शिरताना दोन्ही बाजूंना कोरलेले दगडाचे भालदार, चोपदार उभे असलेले दिसतात. देवळाचा दर्शनी भाग कोरीव असून, त्यावर दोन ऋषींच्या मूर्ती कोरल्या आहेत. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. विघ्नहराची मूर्ती महिरपी डौलदार कमानीत आहे.महडचा वरदविनायकहे रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान. महडच्या वरद विनायकाच्या देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषींनी केली अशी समजूत आहे. या ऋषींनी विनायकाची खडतर तप करून आराधना केली, तेव्हा श्रीविनायक त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. गृत्समदाने स्वतःची शुद्धी आणि आपल्या तपश्चर्येच्या स्थानी देवाचे कायमचे वास्तव्य मागितले. श्रीविनायकाने हे मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला. ते अरण्य म्हणजेच महड होय.या देवळातली मूर्ती धोंडू पौडकर नावाच्या एका गणेशभक्ताला दृष्टांत होऊन तिथल्या तळ्यात सापडली, अशी कथा सांगितली जाते. पौडकरांनी या मूर्तीची तळ्याजवळच्या ज्या कोनाड्यात स्थापना केली तो अखंड दगडाचा आहे. त्यावर नंतर देऊळ बांधण्यात आले.तेव्हापासून आजतागायत या देवळातला नंदादीप अखंडितपणे तेवत आहे, असे सांगतात. पेशव्यांनी या देवळास बरीच मदत केली आहे. हरिहर गोसावी या थोर गाणपत्यांनी सन १७३८मध्ये येथे जिवंत समाधी घेतली होती. आजही हे स्थान मंदिराच्या पूर्वेकडे आहे.हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळाच्या चारी बाजूंना हत्तींच्या दोन-दोन मूर्ती कोरलेल्या आहेत. घुमटावर सोनेरी रंगाचा कळस आहे. घुमटावर वरच्या बाजूस नागाची नक्षी आहे. पाठीमागे तळे आहे. आतील बाजूस सभामंडप आहे. दोन्ही बाजूस कोनाड्यात गणपतीच्या दोन मूर्ती आहेत. प्रवेश करताना वरच्या बाजूलाही गणेशाची मूर्ती दिसते.बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे. दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे. या सिंहासनावर दोन हत्ती व मधे देवी आहे. मूर्ती दगडी असून, तिची सोंड डावीकडे झुकलेली आहे.पालीचा बल्लाळेश्वरश्री बल्लाळेश्वराचे मंदिर ‘श्री’कारयुक्त धाटणीने पूर्वाभिमुख बांधल्यामुळे दक्षिणायनातील उत्तरार्ध व उत्तरायणातील प्रारंभीच्या काळात सूर्योदयाच्या वेळी किरण नेमके श्री बल्लाळेश्वराला स्पर्श करतात. पेशव्यांच्या काळात हे मंदिर बांधले आहे. ‘बल्लाळ’ नावाच्या एका बालकाच्या तपश्चर्येने, भक्तीने संतुष्ट होऊन त्याने पूजा केलेल्या एका शिलाखंडात श्रीगणेशाने निवास केला.देवळाच्या मागच्या बाजूस श्री धुंडीविनायकाचे देऊळ असून, त्यात श्री धुंडीविनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. पूजाअर्चा करताना प्रथम श्री धुंडीविनायकावर अभिषेक, आवर्तने व मग बल्लाळेश्वरावर, अशी प्रथा आहे. गाभाऱ्यात बल्लाळविनायकाची तीन फूट उंचीची मूर्ती आहे. सोंड डावीकडे झुकलेली आहे. उंदराची मूर्ती हातांमध्ये मोदक घेऊन श्री गणेशाकडे पाहत उभी आहे. देऊळ व सभामंडप भव्य आहेत.--------