नामशेष होण्याच्या काठावर असणाऱ्या प्राण्यांच्या-पक्ष्यांच्या, कीटकांच्या, सरीसृपांच्या, वनस्पतींच्या यादीत आणखी तब्बल एक हजार प्रजातींची भर!

जैवविविधता संवर्धनाच्या या विषम लढाईमध्ये वाट्याला येणारे छोटे छोटे विजयही महत्त्वाचेच
जैवविविधता संवर्धन
जैवविविधता संवर्धनEsakal
Updated on

संपादकीय

आडवाटेवरचे सुंदरसे महादेवाचे देऊळ. गच्च झाडीतून डोकावणारे; दगडी महिरपीच्या सभामंडपावर सुबकसे कोरीवकाम मिरवणारे. कैलासाच्या निरवतेत रमणाऱ्या त्या भोलेनाथाला इथल्या शांततेची भुरळ पडली त्यालाही आता कितीतरी शतके लोटली. देवळाच्या समोर एक छोटासा आड. त्या सांबाच्या पिंडीवर यानेच तर धरलीय संततधार आठवणींच्याही आधीपासून. देवळाच्या पायरीच्या अलीकडे एक सुघड नंदी पाय दुमडून बसलेला.

हा नंदी म्हणे दरवर्षी तीळभर पुढे आणि गहूभर मागे सरकतो, आणि ज्या दिवशी नंदी आडात बुडी घेईल तोच दिवस जगबुडीचा, असा पंचक्रोशीचा विश्वास आहे. आज्यापणज्या काळापासून देवळाच्या दारात बसलेला नंदी किती पुढे-मागे सरकलाय त्याचा हिशेब आजतागायत कोणी ठेवलेला नाही, आणि जगबुडी होईल यावर तरी हल्लीची पिढी किती विश्वास ठेवते कोण जाणे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com