(Research based Marathi article about Antibiotics Resistance by Dr. Avinash Bhondave)
डॉ. अविनाश भोंडवे
सुशिक्षित आणि अशिक्षित, शहरी आणि ग्रामीण व्यक्तींना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाचे महत्त्व आणि प्रतिजैविकांचा योग्य वापर कसा करावा याबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे. प्रतिजैविके फक्त आवश्यक असतील तेव्हाच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजेत. ही प्रतिजैविके सांगितलेल्या प्रमाणात आणि सांगितलेल्या वेळेनुसारच घेतली पाहिजेत.
'द लॅन्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकामध्ये १६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, १९९० ते २०२१ या कालावधीत दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोक संसर्गजन्य आजारांत वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचा प्रतिरोध निर्माण झालेला असल्याने मरण पावले.
२०५० पर्यंत हे प्रमाण दरवर्षी २० लाख लोकांचा मृत्यू होण्यापर्यंत वाढू शकते आणि येत्या पंचवीस वर्षांत, सुमारे ९.२ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचा समावेश असेल.
२०२५ ते २०५० या दरम्यान योग्य प्रतिजैविके वापरण्याच्या संदर्भात आणि निरनिराळ्या जंतुसंसर्गांवर अधिक चांगले उपचार कसे व्हायला हवेत, याबाबत हा अहवाल आहे.