मंगेश साखरदांडेपावसाबरोबरचं बिनसलेपण जमेस धरूनही पावसाचं आकर्षण काही ओसरलं नव्हतंच. मृगापासून ते पार हस्तापर्यंत झरणाऱ्या, रिमझिमणाऱ्या, स्रवणाऱ्या, पडणाऱ्या, कोसळणाऱ्या, झोडपणाऱ्या पाऊसधारांचं आमंत्रण तर असायचंच..विनाकारण पावसात भिजणं हे नुस्ते नस्ते चाळे होते तेव्हाची गोष्ट. ‘...पण विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही’च्या चालीवर घडणारी... अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात...म्हणजे त्याकाळात पावसाळी पर्यटन वगैरे चोचले नसायचेच. नुसतंच भिजायचं. डोंगरवाटा धुंडाळत. खूळच ते. बरं, मामला तसा पेचीदा नसायचा. नुसतंच (पावसात) भिजायला जायचं आणि त्यासाठी पडता पाऊस हवा एवढीच मुख्य अट असायची. पण घोळ सुरू झाला, तो त्या पडत्या पावसात बरोबर कोणकोण असायला(च) हवं याची स्वप्नं पडायला लागल्यावर! अर्थात निम्म्या वेळा ती स्वप्नं मनातच राहायची आणि पावसागणिक बदलतही जायची.अशाच एकदा एका स्वप्नाचं बोट धरून पावसात भिजायचं खूळ आलं. आणि इथेच पावसाचं आणि माझं नातं जरासं बिनसलं. स्वप्न ठेंगणं नसलं तरी सुबक, गोऱ्यापानात जमा होईल असं. पौर्णिमेच्या उगवत्या चंद्रबिंबासारखा (पौर्णिमेचा चंद्र मायनस त्याच्यावरचा तो उभ्या कानांचा ससा) सुरेख वाटोळा चेहरा. फारच वाटलं तर पोनीटेल किंवा दोन पिगटेल्सही बांधता येतील अशा खांद्यापर्यंत उतरणाऱ्या केसांच्या लाटा. हरिणाक्षी की मीनाक्षी ह्या पेचात पडण्याआधीच नजरबंद करणारे डोळे... असो, बाकी तपशिलांचा पावसाशी तसा काही संबंध नाहीये; त्यामुळे तिकडे नको जायला... !.तर... सांगायचं म्हणजे, त्याही पावसाळ्यात भिजायला जाण्याची टूम निघाली. फक्त महत्त्वाचा बदल म्हणजे, आता पाऊस हवा या मुख्य अटीला पावसाबरोबर स्वप्नं(सुद्धा) हवं ही अट जोडली गेली होती. मग मोर्चेबांधणी आली. तो अवघड मामलाही जमला. ‘येईल ती’, ह्या दोन शब्दांनी पुढचे तीन शब्द जवळ आणल्याचे भास व्हायला लागले.भिजण्यासाठी मुकर्रर केलेला दिवस उजाडला. उजाडला असं आपलं म्हणायचं, कारण आभाळात रिमझिमत्या कृष्णमेघांची एवढी दाटी होती, की त्यात अडकलेली किरणं सोडवण्याचा नाद सूर्यानेही सोडलेला दिसत होता. गोळाबेरीज म्हणजे, इतके दिवस मनात नुसताच फेर धरून नाचणाऱ्या अनेक शक्यता, शक्यतेच्या कोटीत गणल्या जाण्याच्या शक्यतांमुळे, सेन्सेक्ससारख्या वाढताना दिसत होत्या. पण... घड्याळाचे काटे जसजसे सरकत गेले तसतसा सेन्सेक्स आपटायला लागला, कृष्णमेघांची चंदेरी किनार काळवंडत गेली, मनातला मल्हार मनातच विरत गेला. चिंब करणाऱ्या श्रावणसरी रिमझिमत असतानाच तीनच शब्दांची वीज कोसळली- नाही जमते तिला.पावसाशी पहिल्यांदा बिनसलं ते असं!पावसात भिजत फिरण्याचे प्रसंग नंतर आलेच नाहीत असं नाही, पण ते नुसतंच इथून तिथे जाताना वाटेत पाऊस आडवा आला आणि भिजवून गेला म्हणून. पावसाबरोबरचं बिनसलेपण जमेस धरूनही पावसाचं आकर्षण काही ओसरलं नव्हतंच. मृगापासून ते पार हस्तापर्यंत झरणाऱ्या, रिमझिमणाऱ्या, स्रवणाऱ्या, पडणाऱ्या, कोसळणाऱ्या, झोडपणाऱ्या पाऊसधारांचं आमंत्रण तर असायचंच. ‘गिरीचे मस्तकी गंगा... धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ हे समर्थांचे शब्द अक्षरशः खऱ्या करणाऱ्या धबधब्यांकडे नेणाऱ्या अनवट वाटा, मेघमालांमध्ये लपणारे डोंगरउतार, त्यातून धावणाऱ्या ढोरवाटा, त्यावरचे सडे सजवणारी असंख्य रंगछटांची फुलं मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दबा धरून बसलेली असायचीच. एरवी फक्त वेड्यांत गणल्या जाणाऱ्या भटक्यांचं धन असणाऱ्या त्या; कधी रौद्रभीषण, कधी लोभसवाण्या पावसाळी सौंदर्यानं पुन्हा एकदा पावसाबरोबरच्या गट्टी फू ऽऽवर मात केलीच, भिजायची अनावर ओढ अंगावर आलीच..रिमझिमत्या श्रावणधारांततुझ्या मिठीत विरघळून जातानासांज उतरताना पाहायची आहे,पायतळी लाटा फुटत असताना...अशा ओळींनिशी मग पुन्हा एकदा पावसात भिजण्याचा घाट घातला; जुने दिवस पुन्हा गोळा केले, विखुरलेल्या स्वप्नांसह. पण मधल्या काळात एक गोची झाली होती. पावसात भिजणं इतपतच साधा असणारा प्रकार एकदम ‘पावसाळी पर्यटन’ झाला होता. ‘ही म्हणजे पुन्हा घी देखा लेकीन बडगा नही देखा’ अशीच अवस्था. सगळं मनासारखं जुळून आलं होतं. आभाळात रिमझिमत्या कृष्णमेघांची एवढी दाटी होती, की त्यात अडकलेली किरणं सोडवण्याचा नाद सूर्यानेही सोडलेला दिसत होता. अशा वातावरणात बरोबर असायला(च) हवेत अशा सगळ्यांबरोबर एका सकाळी प्रस्थान ठेवलं.जेमतेम शंभरएक मैलांचा प्रवास. आणि प्लॅन एकदम फुलप्रूफ! पावसामुळे फारशी रहदारी नसणार त्यामुळे एरवीच्या गर्दीत वाट्याला न येणारा निवांतपणा चाखत गावाबाहेर पडून हायवेला लागलं, की पहिल्या हॉटेलात मिसळ चापायची (हा पदार्थ खात नाहीत, चापतात), मस्त आलंबिलं घातलेल्या, पडत्या पावसात गळा शेकणाऱ्या वाफाळत्या चहाचा गिलास हातात घट्ट धरून आखडलेली बोटं मोकळी करून घ्यायची. प्रत्येक वळणावर पडणे ते कोसळणे या दरम्यानच्या अवस्थेतल्या, फक्त याच दिवसात दिसणाऱ्या, धबधब्यांचा आनंद घेत घाट चढायचा; आणि मग घाटमाथ्यावरच्या शेवटच्या वळणावर झापं लावून केलेल्या आडोशाला भणाण वाऱ्यावरचे पावसाचे थेंब अंगावर घेत खेकडा भजी खायची!.पावसात भिजण्याचा साध्याशा वेडाचं पर्यटनात रूपांतर झाल्याची पहिली जाणीव झाली ती मिसळ-ठाण्यावर. एवढ्या पावसात घराबाहेर पडण्याची आपल्याइतकी हौस कोणाला असणारे असा(च) विचार करून काहीशे लोक्स् पावसाळी पर्यटनाला घराबाहेर पडले होते. मिसळीची चवच गेली. तिथून मग गर्दी आणि गर्दी. टोल भरण्याच्या रांगेपासून ते घाटातल्या प्रत्येक वळणावर सालाबादप्रमाणे इमानेइतबारे पडणाऱ्या, कोसळणाऱ्या धबधब्यांच्या आगेमागे पुण्यातल्या तुळशीबागेसारखी किंवा मुंबईतल्या भुलेश्वरासारखी गर्दी आणि असंख्य आवाज! आणि त्या गोंगाटात हरवून गेलेले ते धबधबे, त्या अनवट वाटा, मेघमालांमध्ये लपलेले डोंगरउतार, त्यावरचे सडे सजवणारी असंख्य रंगछटांची फुलं वगैरे वगैरे.रिमझिमत्या श्रावणधारांत, आपल्याच स्वप्नाच्या मिठीत विरघळून जात सांज उतरताना पाहायचा प्लॅनसुद्धा एक्सक्ल्यूझिव्ह राहिला नव्हता. एक रात्र राहायचं, सकाळी दिसला तर मेघांत अडकलेली किरणे सोडवत उगवतीकडून येणाऱ्या सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं आणि माघारी फिरायचं असा मूळ कार्यक्रम. एवढ्या पावसात कोण कशाला बाहेर कडमडेल अशा खात्रीपायी कशाला हवं बुकिंग, तिथे पोचल्यावर बघू हा बाणा एव्हाना रसातळाला गेलेला. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तो पाऊसच कावराबावरा झालेला. मग तो वाफाळता चहा, गरमगरम भाजलेल्या मक्याच्या ओल्या कणसांबरोबर येणारी लिंबू-तिखट-मिठाची वर्णनापलीकडची चव आणि चिंब भिजलेल्या तनामनाला थरथरवणारा तो गारवा सगळंच बिचारं होऊन गेलेलं. पावसाबरोबर पुन्हा एकदा गट्टी फू ऽऽ...पण... विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. कधी रौद्रभीषण, कधी लोभसवाणं दिसणारं पावसाळी सौंदर्य पुन्हापुन्हा खुणावत असतंच. पाऊस अनुभवण्याची ओढ अनावर होतेच. पावसाबरोबरचं ते बिनसलेपण मागे पडतंच. मग मी पुन्हा सगळी स्वप्नं गोळा करतो, पाचव्या, सहाव्या... अकराव्या, बाराव्या मजल्यावरच्या माझ्याच घरात. दारावर महाबळेश्वरपासून ते चेरापुंजीपर्यंतच्या कुठल्याही ओल्या जागेची पाटी लावतो. हातातल्या कॉफीच्या मगाचा उबदारपणा अंगात भिनवून घेत, माझ्याचबरोबर चालत राहणाऱ्या माझ्या स्वप्नाच्या मिठीत विरघळून जात, आपल्या अस्तित्त्वाची जाणीवही न होऊ देणाऱ्या काचेच्या भिंतीपलीकडच्या रिमझिमत्या पाऊसधारांतून उतरणारी सांज पाहात राहतो.पावसाचा ओलावा मनात भिनत जातो, फक्त त्या पावसाला पावसाचा आवाज नसतो.-----------------------------------------.Books : भाषेची चटपटीत मजा आधी कळली तर आपण खऱ्या अर्थाने भाषिक वाचन संस्कारांकडे जाऊ...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.