प्रा. शामकांत देशमुखसध्या महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये स्वायत्त होत आहेत. पण मुळात स्वायत्त महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक पालक व विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व शंका असतात. त्याविषयी....केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्या उच्च शिक्षणाच्या धोरणांनुसार ज्या महाविद्यालयांचे नॅक (NAAC) बंगळूर या संस्थेद्वारे मूल्यांकन झाले आहे व त्यात ज्या महाविद्यालयांना ‘ए’, ‘ए+’ व ‘ए++’ श्रेणी प्राप्त झाली आहे, अशी महाविद्यालये संलग्न विद्यापीठाचे व शासनाच्या उच्चशिक्षण विभागाचे ना हरकत पत्र प्राप्त करून विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडे महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात..ज्या महाविद्यालयांना नॅककडून ‘ए+’ व ‘ए++’ श्रेणी आहे, अशा महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तज्ज्ञ समितीच्या भेटीशिवाय स्वायत्त दर्जा बहाल केला जातो तर ‘ए’ श्रेणी प्राप्त असलेल्या महाविद्यालयांना तज्ज्ञ समिती प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अहवाल सादर करून शिफारस करते व त्यानंतर अशा महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यात येते..महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यामागे केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोग यांची नेमकी काय भूमिका आहे ते समजून घेऊया. उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल व त्यातूनच देशाची प्रगती होईल हे ओळखून महाविद्यालयांची स्वायतत्ता ही संकल्पना पुढे आली. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य दिल्याने ते गरजेप्रमाणे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत व संशोधनाला चालना मिळेल..अनेक महाविद्यालयांचे विविध अभ्यासक्रमांचे कटऑफ गुण ९० टक्क्यांहून अधिक असतात, पण महाविद्यालये स्वायत्त नसतील तर विद्यापीठाने घालून दिलेलाच अभ्यासक्रम व मूल्यांकन पद्धत अवलंबली जाते. वास्तविक पाहता ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षमतेप्रमाणे अभ्यासक्रमात काठिण्यपातळी का स्वीकारण्यात येऊ नये, हीदेखील एक महत्त्वाची भूमिका महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्यामागे आहे, हे विसरून चालणार नाही.उदाहरण द्यायचे झाल्यास ज्या विद्यार्थ्याला बारावी कॉमर्सला ९२ टक्के गुण आहेत व महाविद्यालयाचा बी.कॉम. या अभ्यासक्रमाचा कटऑफ ९० टक्के आहे, अशा स्वायत्त नसणाऱ्या महाविद्यालयांना, विद्यापीठांनी घालून दिलेल्या सर्वसाधारण अभ्यासक्रमाचे अवलंबन करण्यापेक्षा स्वतंत्र वेगळा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा नसते. थोडक्यात ४० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्याला जो अभ्यासक्रम असतो, तोच अभ्यासक्रम ९२ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही असतो. त्यामुळे तो त्यांच्या क्षमतेप्रमाणे नसतो. हे टाळण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयांची स्वायत्तता महत्त्वाची ठरेल असे वाटते..स्वायत्तता मिळाल्यानंतरही अशी महाविद्यालये कायम त्या त्या विद्यापीठांशी संलग्न असतात हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. या बाबतीत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम असतो. अशा स्वायत्त महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यास महाविद्यालय व विद्यापीठ यांच्याकडून विद्यार्थ्याला संयुक्त पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात येते व प्रत्येक गुणपत्रकावर संबंधित महाविद्यालय व विद्यापीठ या दोन्हींचा स्पष्ट उल्लेख असतो. काही कनिष्ठ महाविद्यालये स्वायत्त महाविद्यालयांशी जोडलेली असतात. असे असले तरी अशा कनिष्ठ महाविद्यालयांचा स्वायत्त महाविद्यालयांशी कोणताही संबंध नसतो. थोडक्यात स्वायत्तता ही वरिष्ठ महाविद्यालयास म्हणजे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमापुरती मर्यादित असते. कनिष्ठ महाविद्यालये संबंधित उच्चमाध्यमिक मंडळाशी संलग्न असतात..स्वायत्ततेमुळे महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना नेमके काय फायदे होतात ते पाहू-स्वायत्त महाविद्यालये विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करू शकतात.अभ्यासक्रमात कालानुरूप योग्य ते बदल सहज व लवकर करू शकतात.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्तर व दर्जानुसार अभ्यासक्रमात बदल केले जाऊ शकतात.अभ्यासक्रमात नावीन्यपूर्ण औद्योगिक, सेवा, आयटी, बँकिग, कॉर्पोरेट, संशोधन क्षेत्रांशी संबंधित मनुष्यबळाच्या गरजेनुसार तत्काळ बदल करणे सोपे व सोयीचे असते. स्वायत्त महाविद्यालये अशा अभ्यासक्रमाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात व याबाबतीत महाविद्यालयांना संपूर्णपणे स्वातंत्र्य असते.निवडलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास पूरक कौशल्य विकसित होण्यासाठी जास्तीचे अभ्यासक्रम, मूल्यवर्धित, प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून दिले जातात.विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वातंत्र्यही मिळते. ते आपल्या आवडीचा एखादा अभ्यासक्रम निवडून त्याचे श्रेयांक मिळवू शकतात. महाविद्यालये स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरची गरज ओळखून व नवे अभ्यासक्रम तयार करून मनुष्यबळ निर्मितीत भरीव योगदान देऊ शकतात. साचेबद्ध, सर्वसमावेशक पद्धतीने आखलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा आपल्या क्षमतेप्रमाणे नावीन्यपूर्ण व काळानुरूप बदल केलेला अभ्यासक्रम स्वीकारणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत हिताचे ठरते..स्वायत्त महाविद्यालये व विद्यापीठे यांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम स्वतंत्र व वेगळे असतात. हे ठरविताना विद्यापीठांना शहरी, ग्रामीण भाग, सर्वसाधारणपणे उपलब्ध पायाभूत सुविधा, भौगोलिक परिस्थिती विचारात घ्यावी लागते. तर स्वायत्त महाविद्यालये त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, भौगोलिक परिस्थिती, मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ठरवतात.उदाहरण द्यायचे झाल्यास, विद्यापीठाचा बी.कॉम.चा अभ्यासक्रम वेगळा असेल स्वायत्त महाविद्यालयाचा वेगळा असेल. तर नव्याने आलेली जीएसटीसारखी संकल्पना तत्काळ स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे शक्य होते व त्या क्षेत्राची मनुष्यबळाची गरज भागविता येते. अशी उदाहरणे प्रत्येक शाखेबाबत देता येतील..स्वायत्त महाविद्यालयात विविध विषयांची स्वतंत्र अभ्यासमंडळे असतात तर मंडळाकडून मान्य झालेल्या अभ्यासक्रमास विद्यापरिषद मान्यता देते. स्वायत्त महाविद्यालयास स्वतंत्र महाविद्यालयीन विकास समिती, नियामक मंडळ व अर्थसमिती असते. त्याद्वारे महाविद्यालयाचे नियमन चालते. त्यामध्ये विविध घटकांचे प्रतिनिधी असतात.स्वायत्त महाविद्यालयांना त्यांची परीक्षापद्धत राबविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. गुणपद्धतीचा अवलंब करावा की श्रेयांक पद्धतीचे अवलंबन करावे, वर्षाअखेरीस परीक्षा घेण्यापेक्षा सातत्याने ठरावीक अंतराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करावे, हे अभ्यासक्रमाच्या विषयानुसार ठरवता येते. .उदाहरणार्थ, एमसीक्यू टेस्ट, क्वीझ, सब्जेक्टिव्ह टेस्ट, ओपन बुक टेस्ट, प्रोजेक्ट, सेमिनार, प्रेझेंटेशन, केस स्टडीज, होम असाइनमेंट्स, फील्ड व्हिजिट, सर्व्हे रिपोर्ट इत्यादींचे अवलंबन करण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी वापरता येत नाही. ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच परीक्षा व मूल्यांकन करावे लागते. सातत्याने विविध प्रकारच्या परीक्षांमधून संबंधित विषयाच्या ज्ञानाबाबत मूल्यांकन होत असल्याने विद्यार्थी कायम अभ्यासाशी जोडलेले राहतात. त्यांची आवड व रुची वाढते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करताना ते स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करतात. यामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती वाढते. सहयोगी विद्यार्थ्यांबरोबर वार्तालाप, चर्चा, विचारांची देवाणघेवाण होते. संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होते. आपापसात निकोप स्पर्धा निर्माण होते. या सर्व गोष्टींचा अंतिम परिणाम चांगला होतो. .स्वायत्त महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यापीठाचे व शासनाचे सर्व निकष, मार्गदर्शक तत्त्वे, बिंदू नामावली यांचे पालन करणे क्रमप्राप्त असते. विद्यापीठ तसेच शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजना यांचा लाभ घेता येतो. महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रत्येक स्तरावरील सक्रिय सहभाग, योगदान, ज्ञान, मार्गदर्शन व कार्यप्रेरणा मोलाची ठरते. .या सर्व बाबींचा परिपाक म्हणून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. तसेच काही विद्यार्थी स्वयंरोजगार निर्मितीचा पर्याय निवडतात. कॉर्पोरेट, औद्योगिक, सेवा, प्रशासकीय, आयटी, बँकिग, वित्त, संगणक, जैवतंत्रज्ञान, व्यापार इत्यादी क्षेत्रास अपेक्षित असलेले स्कील्ड मनुष्यबळ उपलब्ध करून देता येते. साहजिकच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नामी संधी उपलब्ध होतात. या विद्यार्थ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज भासत नाही. परिणामी कंपन्यांचा वेळ व पैसा वाचतो. असे विद्यार्थी कामावर रुजू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून आपले दैनंदिन कामकाज सुरू करू शकतात. अशी परिस्थिती महाविद्यालये व औद्योगिक कंपनी या दोन्हीच्या दृष्टीने परस्परहिताची ठरते. याचा फायदा औद्योगिक व शैक्षणिक संस्थांमध्ये हितसंबंध विकसित होण्यास होतात. शैक्षणिक स्वातंत्र्य दिल्याने संशोधनास चालना मिळेल व निर्मितीचा ध्यास प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये रुचेल. याचा समाजास फार मोठा फायदा होईल.नजीकच्या काळात अनेक महाविद्यालये स्वायत्ततेचा पर्याय निवडतील. पालक, विद्यार्थी व नोकरी देणाऱ्या संस्था, कंपन्या या प्राधान्याने स्वायत्त महाविद्यालयांकडे प्रवेशाच्या दृष्टीने व रोजगारनिर्मितीचे केंद्र म्हणून आकर्षित होतील यात शंका नाही.प्रा. शामकांत देशमुख मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात संगणकशास्त्र विभाग विभागप्रमुख आहेत.------------------.Career in Creative Communication: माध्यम, जाहिरात, चित्रपट क्षेत्रात सर्जनशील काम करायचे असल्यास निवड करा या अभ्यासक्रमांची .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.