डॉ. स. प्र. सरदेशमुखकॅन्सरतज्ज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चिकित्सा घेत असताना आयुर्वेदोक्त चिकित्सा व हितकर आहार-विहाराचे पालन केल्यास कॅन्सरवर मात करणे रुग्णास व वैद्यास शक्य आहे, असे अनेक वैद्यांचे मत आहे..भारतीय संस्कृती, कला, वेद, शास्त्र, आयुर्वेद व अध्यात्मातील अधिकारी परमपूज्य प्रभाकर सरदेशमुख महाराजांनी १९५४मध्ये भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट’ची स्थापना केली. आयुर्वेद या पुरातन भारतीय वैद्यकशास्त्राच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी १९८४मध्ये ट्रस्टतर्फे आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू केले. या रुग्णालयात व संशोधन केंद्रात कॅन्सर, एड्स, विलंबित अस्थिभग्न, माता-बालसंगोपन अशा आरोग्यासंबंधी विषयांवर संशोधन सुरू आहे. परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी माझ्यासह १९९४मध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या साहाय्याने पुण्यात व मुंबईत कॅन्सर संशोधन प्रकल्पास सुरुवात केली. १९९५मध्ये सोलापूरमधील प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. शिरीष कुमठेकर यांच्या समन्वयाने सोलापूर येथे या प्रकल्पाची सुरुवात झाली. सध्या मुंबई, दादर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, बंगळूर व नवी दिल्ली येथेही प्रकल्पाची केंद्रे कार्यरत आहेत.कॅन्सरग्रस्त रुग्णांना आयुर्वेदाच्या साहाय्याने आराम देता यावा, त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारता यावी, आयुर्मान वाढविता यावे व केमोथेरपी तसेच रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करून या चिकित्सापद्धती अपेक्षित कालावधीत रुग्णांना पूर्ण करता याव्यात, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.आयुर्वेदशास्त्रात सामान्यतः कोणत्याही व्याधीची चिकित्सा शोधन, शमन, आनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा, पथ्यापथ्य व समुपदेशन अशी केली जाते. वृद्धापकाळामुळे उद्भवणाऱ्या दोषांना वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण व नस्य या पंचकर्मांच्या साहाय्याने शरीराबाहेर काढणे, म्हणजे शोधन चिकित्सा. औषधांच्या साहाय्याने शरीरातील वृद्ध व व्याधी निर्माण करणाऱ्या दोषांना साम्यावस्थेत आणणे, म्हणजे शमन चिकित्सा. लेप, शिरोधारा, गंडूष, नेत्रतर्पण यांसारखे अनुषंगिक उपक्रम, शरीरधातूंना बल देणारी व पर्यायाने व्याधिक्षमत्व वाढविणारी रसायन चिकित्सा. पथ्यकर व अपथ्यकर आहार व विहाराबाबत मार्गदर्शन म्हणजे पथ्यापथ्य तर मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन. असे आयुर्वेदातील व्याधिचिकित्सेचे प्रकार आहेत.शोधन चिकित्सा, म्हणजेच पंचकर्म चिकित्सा घेण्यासाठी रुग्णाचे शारीरिक बल उत्तम असणे, व्याधीचे बल अधिक असणे व शरीरात आमदोषाची लक्षणे नसणे या गोष्टी आवश्यक असतात. कॅन्सरमुळे, तसेच केमोथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रकर्म अशा उपचारांमुळे बरेच कॅन्सर रुग्ण दुर्बळ झालेले असतात. .मात्र ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचे बल चांगले असते, अशा रुग्णांत, पंचकर्म ही समूळ व्याधींचा नाश करणारी चिकित्सा असल्याने अधिक लाभदायी ठरते. दीपन, पाचन यांसारख्या शमन चिकित्सेमुळे काहीवेळा व्याधीचा पुनरुद्भव होतो, परंतु शोधन चिकित्सेने बऱ्या झालेल्या व्याधी पुन्हा उद्भवण्याची संभावना कमी असते.शोधन चिकित्सा तीन टप्प्यांत पूर्ण होते. स्नेहन म्हणजे सर्व शरीरास मसाज करणे व स्वेदन म्हणजे सर्व शरीरास औषधी काढ्याची वाफ देणे. या दोन कर्माचा समावेश पूर्वकर्मात होतो. प्रधान कर्मात वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण व नस्य या पाच कर्मांचा समावेश होतो. वामक औषधांची चूर्णे किंवा काढे देऊन रुग्णास उलटी करविणे म्हणजे वमन होय.रेचक औषधे देऊन पित्ताशयातील दोष गुदमार्गाने बाहेर काढणे म्हणजे विरेचन होय. ही प्राधान्याने पित्तदोषाची चिकित्सा आहे. औषधी तेल/ घृत (तूप) किंवा औषधी काढे यांच्या गुदमार्गाने दिलेल्या बस्तिस अनुवासन बस्ति तर काढ्याच्या बस्तिला निरुह बस्ति म्हणतात. ही वातदोषाची प्रधान चिकित्सा आहे. अलाबू, शृंग, जलौका किंवा यंत्राच्या साहाय्याने सिरेचा वेध घेऊन रक्तमोक्षण केले जाते.ही दुष्ट रक्तधातूची चिकित्सा आहे. नाकपुड्यांतून औषधी तेले/ तूप, चूर्ण प्रविष्ट करणे यास नस्य म्हणतात. नस्य ही प्राधान्याने शिर प्रदेशातील कुपित वात व कफाची चिकित्सा आहे. वरील पाच कर्मांपैकी ज्या व्याधीत जे कर्म आवश्यक आहे ते तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. पश्चातकर्मात संसर्जनक्रम म्हणजे विशिष्ट पथ्यकर आहार विहार योजनेचा समावेश होतो.विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये विशिष्ट प्रकारचे पंचकर्म उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ मस्तिष्क, गल (घसा), फुप्फुस यांत वमन; ग्रहणी, लघ्वन्त्र, पित्ताशय, यकृताचा कॅन्सर, ल्युकेमिया यांत विरेचन; बृहदान्त्र, गुद, प्रोस्टेट, पुरुष बीजाण्ड, योनि, गर्भाशय, स्त्री बीजाण्ड, अस्थि यांच्या कॅन्सरमध्ये बस्ति; मस्तिष्क, नासा, तालू यांच्या कॅन्सरमध्ये नस्य व यकृत; पित्ताशयाचा कॅन्सर, ल्युकेमिया यांत रक्तमोक्षण केले जाते.अर्थात हे सर्व उपक्रम जितके तत्काळ फलदायी असतात, तितकेच चूक झाल्यास तत्काळ उग्र उपद्रव निर्माण करणारे असतात. त्यामुळे ते वैद्यांच्या सल्ल्याने व पूर्णतः वैद्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक असते.शोधन चिकित्सा घेण्यास रुग्णाचे बल चांगले असणे आवश्यक असते. कॅन्सरमुळे रुग्ण दुर्बल झाला असल्यास, त्याला शोधन चिकित्सा देता येत नाही. अशा वेळी रुग्णास शमन चिकित्सा देणे आवश्यक ठरते. यात प्राधान्याने मुखावाटे औषधे देऊन वाढलेल्या दोषांना शरीरात साम्यावस्थेत आणले जाते.यात एकेरी वनस्पतीज चूर्णे, मिश्र चूर्णे, गुटी-वटी, आसव-अरिष्ट, गुग्गुळ कल्प, सिद्ध तेल, सिद्ध घृत, काढे, ताजा रस (स्वरस), सिद्ध जल, सिद्ध दुग्ध, शर्करायुक्त कल्प, रसकल्प अशा विशिष्ट औषधींचा समावेश होतो.शिरोधारा व शिरोबस्ति, नेत्रबस्ति, योनिपिचू, योनिधावन, अवगाह स्वेद, लेप, गंडूष, अवचूर्णन यांसारखे आनुषंगिक उपक्रम विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपयुक्त ठरतात. कॅन्सरमध्ये रसादि सात धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि सात धातूंना बल देणारी रसायन चिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते..यात दूध, तूप, साळीचा भात यासारखा सात्विक रसायन आहार, शतावरी, गोक्षुर, अश्वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यासारखी रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन म्हणजेच धर्मविहित आचरण यांचा समावेश होतो.आयुर्वेद शास्त्रात व्याधीचा समूळ नाश करण्यासाठी औषधांइतकेच, किंबहुना अधिकच महत्त्व पथ्यकर आहार विहाराला दिले आहे. ‘संक्षेपतः क्रियायोगो निदानपरिवर्जनम् ।’ म्हणजे ज्या कारणांनी व्याधी झाली त्यांचा त्याग करणे. हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने असा आहार या रुग्णांनी वर्ज्य करावा. व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे, हेच सर्व व्याधींचे मूळ असल्याने कॅन्सरमध्येही व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर ठरतो.यासाठी तांदूळ भाजून भात - साठेसाळी मिळाल्यास उत्तम, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका, ज्वारीची-तांदळाची भाकरी, रव्याची पेज, रव्याचा गोड शिरा, उपमा, मुगाचे वरण, मसुराचे वरण, पडवळ, कोबी, दुधी, भेंडी, दोडका, तांदुळजा, चाकवत, कोरळ (कांचनार), वसु (पुनर्नवा) यांसारख्या भाज्या; तूप, जिरे, धणे, आले, लसूण, कांदा, पुदीना यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश करावा.ल्युकेमिया, म्हणजे रक्ताचा कॅन्सर झालेल्यांच्या आहारामध्ये मुळा, बीट, गाजर यांची दही न घालता केलेली कोशिंबीर, लसूण, कोथिंबीर, धणे, जिरे, पुदिना यांची चटणी तोंडी लावण्यास असावी. कॅन्सरमध्ये बहुतांशी भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे अशी लक्षणे दिसत असल्याने मोरावळा, लिंबाचे गोड लोणचे, सुधारस यांचा जेवणात समावेश करावा. बहुतांशी गोड, आंबट रसाची फळे तर्पण करणारी असतात. कॅन्सरने ग्रस्त रुग्णांना गोड द्राक्षे, गोड डाळिंब, सफरचंद, पपई अशी फळे, तसेच काळ्या मनुका, अंजीर, खजूर, जरदाळू अशा प्रकारची ड्रायफ्रूट्स दुपारच्या वेळेत द्यावीत.फळे ताजी व गोड असावीत. फळांचे रस पिण्याऐवजी आख्खी फळे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा विकारही संभवणार नाही. हिवाळ्यात, पावसाळ्यात फळांच्या फोडींना सुंठ पूड, जिरे पूड, मिरे पूड लावून सेवन केल्यास कफाचे विकार संभवणार नाहीत. मांस पचण्यास जड असले, तरी ज्या कॅन्सर रुग्णांचे वजन कमी होत आहे, बलक्षय झाला आहे, अस्थींमध्ये कॅन्सर पसरला आहे अशा रुग्णांनी तूप, जिरे, मिरे, आले, लसूण अशा पाचकद्रव्यांची फोडणी देऊन केलेले मटण सूप किंवा चिकन सूप घेतल्यास लाभदायक ठरते.रक्तक्षय, पांडुरोगाची लक्षणे असल्यास प्राधान्याने पाया सूप किंवा लिव्हर सूप उपयुक्त ठरते. थोडक्यात पचनास हलका, परंतु शरीरातील रस-रक्तादी सप्तधातूंचे वर्धन-तर्पण करणारा, मल-मूत्रांचे शरीराबाहेर योग्यप्रकारे विसर्जन करण्यास मदत करणारा, प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार कॅन्सर रुग्णांना पथ्यकर असतो.खरेतर कॅन्सरचे नाव ऐकल्यावरच रुग्णाचे मनोधैर्य खचलेले असते. आता मृत्यूशिवाय पर्याय नाही, या कल्पनेने मनात सतत विपरीत विचार येत असतात. अशावेळी शरीराला फार कष्ट पडणार नाहीत, परंतु मनास विरंगुळा मिळेल अशा आवडीच्या कामांत अथवा छंदांत रुग्णाचे मन गुंतवणे, ही मानसिक चिकित्साही अत्यावश्यकच असते.अशाप्रकारे कॅन्सरतज्ज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चिकित्सा घेत असताना आयुर्वेदोक्त चिकित्सा व हितकर आहार-विहाराचे पालन केल्यास कॅन्सरवर मात करणे रुग्णास व वैद्यास शक्य आहे, असे अनेक वैद्यांचे मत आहे.(डॉ. स. प्र. सरदेशमुख इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक आहेत.)-------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.