इरावती बारसोडेआहार आणि विहार योग्य असावा हे आयुर्वेदानं मला पटवून दिलंय. फक्त आहार-विहारच नाही, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता सर्व काही प्रमाणात करावं ही शिकवणही मला आयुर्वेदानं दिलीये..‘‘आयुर्वेदानं लवकर इफेक्ट होत नाही, खूप दिवस औषध घेत बसावं लागतं. तेही कसली कसली चूर्णं नि काढे!’’‘‘मुळात आयुर्वेदिक औषध म्हणजे काही फक्त चूर्ण आणि काढे नाही. गोळ्यापण असतात. आणि मुख्य म्हणजे त्या औषधानं एकदा बरं वाटलं, की ते दुखणं परत परत उद्भवत नाही. अॅलोपॅथीनं लगेच बरं वाटत असेलही, पण परत ते दुखणं डोकं वर काढणार नाही याची काय गॅरंटी?’’त्या दिवशी ‘अॅलोपॅथी इज द अल्टिमेट पॅथी’ असं मानणाऱ्या एकाशी मी उगाचच वाद घालत होते, त्याला यातलं काहीही पटणार नाहीये हे माहीत असूनही. कारण मला त्याच्या मनात ठासून भरलेले आयुर्वेदाविषयीचे गैरसमज त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. ते गैरसमज दूर करण्यात फारसं यश मिळालं नाही, ही बाब अलाहिदा. पण नंतर स्वतःशीच विचार केल्यावर वाटलं, अरे, आपण कधीपासून आयुर्वेदाबद्दल इतक्या आग्रही भूमिकेतून बोलायला लागलो?मन झर्रर्रकन दहा वर्षं मागं गेलं. एका दुखण्याच्या निमित्तानं एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टर आम्हाला नवीनच होते. आधीच्या डॉक्टरांचं औषध काही लागू होत नव्हतं; मुळात त्यांना निदानच झालं नव्हतं हे नंतर कळलं. तर या आयुर्वेदिक डॉक्टरांनी माझं सगळं ऐकून घेतलं आणि पहिला प्रश्न विचारला, ‘‘व्यायाम काय करतेस?’’‘‘घालते सूर्यनमस्कार...’’ काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं, आणि मनात... ‘आता दुखण्याचा आणि व्यायामाचा काय संबंध?’‘‘किती?’’‘‘बारा...’’‘‘फक्त? वय काय तुझं??? १०८ सूर्यनमस्कार घालायला पाहिजेस तू. आणि बाहेर किती खातेस?’’आता झाली का पंचाईत... ‘‘खाते तसं अधूनमधून...’’‘‘आता काही दिवस खायचं नाही. ब्रेड, आंबवलेले पदार्थ पूर्ण बंद. खाशील ते पूर्ण पचवायला शीक आधी, मग खा बाहेरचं. आणि व्यायाम कम्पल्सरी!’’हे सगळे निर्बंध ऐकून आणि औषध म्हणून दिलेल्या काळपट-करड्या रंगाच्या पुड्या बघून सुरुवातीला चिडचिड झाली खरी, पण आता जाणवतं... ती सुरुवात होती... आयुर्वेद माझ्या जीवनशैलीचा भाग होण्याची..आजही कधी काही आरोग्याच्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडे गेले, की व्यायाम करतीयेस ना, हा प्रश्न हमखास असतो. ‘नाही हो, बरीच गॅप पडलीये,’ असं म्हटलं, की ‘जा दारामागची काठी घेऊन ये,’ असा प्रेमळ दम मिळतोच. १०८ सूर्यनमस्कार घालायला मला अजूनही जमलेलं नाही, पण व्यायामाचं महत्त्व मात्र मला चांगलं पटलंय. व्यायाम न करणं फारसं कठीण नसतं, व्यायाम का होत नाही याची वाट्टेल ती कारणं देता येऊ शकतात. पण नेटानं नियमित व्यायाम करायला मात्र मनाचा निग्रहच लागतो, तो मिळवणं फार फार कठीण. मनाचा निग्रह पूर्णतः जमलाय असं मी म्हणणार नाही, पण व्यायामाची सवय मात्र लागली आहे. व्यायामात मोठी गॅप पडली तर आपसूकच कसंतरी व्हायला लागतं. पण हे ‘कसंतरी व्हायला’सुद्धा मधे काही वर्षं जावी लागली, हे खरं.नियमित व्यायामासाठी मनाचा निग्रह जसा आवश्यक, तसाच जिभेवर ताबाही आवश्यक. त्या दुखण्यामुळं त्यावेळी मला बरीच पथ्यं पाळावी लागली, पण त्याचा फायदा झाला. बाहेरचं खाणं टाळणं शक्य होत नाही, त्यामागे अनेक कारणं असतात; कधी ऑफिसची पार्टी असते, कधी स्वयंपाकाच्या मावशी ऐनवेळी दांडी मारतात, कधी जुन्या मित्रांबरोबर डिनर प्लॅन असतो... वगैरे वगैरे. पण हे कधीतरीच होत असेल तर त्याचा शरीराला अपाय नाही. बाहेर खाण्यात काही वावगं नाही, पण ते पचवायची ताकद हवी, हा धडा आता पक्का लक्षात राहिलाय माझ्या. मात्र त्यासाठी रोजचा आहार परिपूर्ण, सकस हवा. मग आठवड्यातून एकदा आडवा हात मारून बाहेरचं चमचमीत खायला काही वाटत नाही.आयुर्वेदाबद्दलच्या कुतूहलापोटी थोडंफार वाचन केलं, तेव्हा अगदी घरच्या घरी उपलब्ध होतील अशा पदार्थांमध्येच छोटे छोटे उपाय दडलेले असतात, हे कळलं. प्रोटीनची गरज असेल, तर पंचडाळींचं वरण आहारात समाविष्ट करा. पोट बिघडलंय, डिहायड्रेशन झालंय, मग भाताची पेज प्या. पोट साफ होत नाहीये, रात्री झोपताना दुधात तूप घालून प्या. .एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या स्नायूंची ताकद कमी पडत असेल, तर दूध-ज्येष्ठमध प्यायला सांगितलं जातं. आहारातूनच असे छोटेछोटे उपाय आयुर्वेद सांगतो. अर्थात, व्यक्तीनुरूप या उपायांचं स्वरूप बदलतं.काही वेळा आहार-व्यायाम सगळं व्यवस्थित सुरू असतं, काहीही वेडवाकडं केलेलं नसतं, तरी एखादं छोटं दुखणं डोकं वर काढतं, आणि बघताबघता मोठं होतं. मग डॉक्टर विचारतात, कसला स्ट्रेस घेतीयेस? आणि औषध देताना त्यात डोकं शांत व्हायला मदत होईल असंही काही घालून देतात.आयुर्वेद म्हणजे फक्त चूर्णं किंवा काढे असा अनेकांचा गैरसमज असतो. पण ॲलोपॅथीच्या असतात तशा गोळ्या आणि लिक्विड स्वरूपात आयुर्वेदिक औषधं खूप आधीपासून मिळतायत. पण त्यांची नावं मात्र जरा ‘भारदस्त’च वाटावीत अशी असतात, आणि लक्षात ठेवायला जरा अवघडच! निशामलकी, दशमुलारिष्ट, अभ्रलोह वगैरे वगैरे.त्यातलं सगळ्यात भारी वाटलं ते, कुक्कुटाण्डत्वक् भस्म! कॅल्शियम आहे हे. आईसाठी आणायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. काही केल्या हे नाव लक्षात राहत नव्हतं, म्हणून पाठ करायचं ठरवलं. मनातल्या मनात म्हणून पाहिलं, तेव्हा दरवेळी काहीतरी वेगळाच उच्चार व्हायचा.. कुक्कुटभस्म, कुण्डत्वक भस्म असं काहीही! मग त्या नावाने एक चाळाच लावला.आहार आणि विहार योग्य असावा हे आयुर्वेदानं मला पटवून दिलंय. फक्त आहार-विहारच नाही, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता सर्व काही प्रमाणात करावं ही शिकवणही मला आयुर्वेदानं दिलीये.व्यायाम होत नाहीये, बाहेरचं खाणं वाढलंय, स्ट्रेस वाढलाय, स्क्रीन टाइम वाढलाय, झोप होत नाहीये... अशा अनेक शरीरासाठी घातक गोष्टी सलग होत गेल्या, की शरीर बोलायला लागतं. ते ऐकता आलं पाहिजे. शरीराचं ते म्हणणं समजून घेऊन वेळीच आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे, तरच आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीबरोबर निभावून नेता येईल...आयुर्वेद म्हणजे काय हे माहितीये का तुला, असा प्रश्न जर कोणी मला विचारला, तर आयुर्वेदानुसार प्रत्येक माणसाच्या शरीरात वात, कफ, पित्त अशा तीन प्रकृती असतात आणि त्या कमी-अधिक प्रमाणात त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करतात, यापलीकडे मला फारसं काही सांगता येणार नाही.आयुर्वेदामध्ये फक्त लक्षणाधारित उपचारांपेक्षा आजार समूळ काढून टाकण्यावर भर दिला जातो, म्हणूनच कदाचित कोणताही मुरलेला वैद्य किंवा आयुर्वेदाचार्य आधी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायला सांगतो. मग आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवनशैली आहे, असं म्हणावं का?--------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.