डॉ. योगेश प्रभुणे काढा या औषधी कल्पनेला क्वाथ, शृत, कषाय अशी अनेक नावे आहेत. पूर्वीपासून अनेक आजारांवर उपचार म्हणून काढे वापरले जातात. सध्याच्या युगात आयुर्वेदाच्या सिद्धांताला अनुसरून नवीन तंत्रज्ञान वापरून काही फार्मसी प्रवाही क्वाथ तयार करतात..आयुर्वेद हे भारतातील एक प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. निरोगी व्यक्तीचे स्वास्थ्य उत्तम कसे राहील, हा प्रतिबंधात्मक विचार प्रथम आणि मग व्यक्ती आजारी पडलीच तर काय काय उपाय करावेत, व्याधीमुक्त होण्यासाठी कोणत्या आवश्यक त्या औषधमात्रा द्याव्यात, हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे.प्रयोजनं चास्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातुरस्य विकारप्रशमनं च - चरक संहिता सूत्रस्थान ३०/२६आयुर्वेद त्रिस्कंध म्हणजे तीन स्तंभांवर आधारित आहे. ते पुढील प्रमाणे:हेतू : रोगाचे कारणलिंग : रोगाची लक्षणेऔषध : उपचारआयुर्वेद म्हणजे आयुष्य कसे जगावे हे सांगणारे शास्त्र. प्रत्येक ऋतूमध्ये कसे वागावे, कोणता व्यायाम कधी कसा करावा, कोणी करावा, कोणी करू नये. काय खावे, कधी खावे, कसे खावे आणि काय खाऊ नये यांबाबत आयुर्वेद सविस्तर मार्गदर्शन करतो. आयुष्य जगताना जर कधी आजारी पडलोच तर त्यावर उपाय म्हणून औषध, कोणते पथ्य पाळावे, याचे दिशादर्शनही या शास्त्रामध्ये आहे.वैद्य, औषधी द्रव्य, परिचारक (शुश्रुषा करणारी व्यक्ती) व रोगी हे उपचाराचे चार आधारस्तंभ आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहेत. यामध्ये वैद्यानंतर औषधी द्रव्य या विषयाचे महत्त्व सांगितले आहे.कोणतेही शास्त्र हे कालानुरूप प्रगत व कालसुसंगत म्हणजेच मानवी समाजाला उपयुक्त बदल सामावून घेणारे असेल तरच त्या शास्त्राची प्रगती होते व ते शाश्वत ठरते. आयुर्वेदसुद्धा असाच पुरातन वैदिक काळापासून ते आत्तापर्यंत असे बदल सामावून घेणारा आहे म्हणूनच आयुर्वेद शाश्वत आहे.प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये प्रथम पंचविध कषाय कल्पना (पाच प्रकारच्या औषधी उपाययोजना) वर्णन केली आहे. त्या पुढील प्रमाणे आहेत.स्वरस (Juice) : वनस्पतीचा अंगभूत रस जो ताजी वनस्पती ठेचून मग कापडातून गाळून काढला जातो.चूर्ण/ कल्क (Powder or Paste) : पावडर स्वरूपातील द्रव्य उदाहरणार्थ, वेलची चूर्ण / ताज्या द्रव्यांचा वाटून केलेला चटणीसारखा गोळा. उदाहरणार्थ, आल्याचा चटणीसारखा गोळा.क्वाथ / काढा / श्रृत/ कषाय ( Decoction)हिम (Cold Infusion) : थंड पाण्यात भिजवलेले औषध.फांट( Hot Infusion) : गरम पाण्यात भिजवलेले औषध.पञ्चविधं कषायकल्पनमिति तद्यथा- स्वरसः, कल्कः, श्रृतः, शीतः, फाण्टः, कषाय इति।(यन्त्रनिष्पीडिताद्द्रव्याद्रसः स्वरस उच्यते। यः पिण्डो रसपिष्टानां स कल्कः परिकीर्तितः ।।वह्नौ तु क्वथितं द्रव्यं श्रृतमाहुश्चिकित्सकाः। द्रव्यादापोत्थितात्तोये प्रतप्ते निशि संस्थितात् ।।कषायो योऽभिनिर्याति स शीतः समुदाहृतः। क्षिप्त्वोष्णतोये मृदितं तत् फाण्टं परिकीर्तितम् ।।)- चरक संहिता सूत्रस्थान ४/७काढा या औषधी कल्पनेला क्वाथ, श्रृत, कषाय अशी अनेक नावे आहेत. चरक संहितेनुसार कोणतेही द्रव्य पाण्यात/द्रव पदार्थात उकळले, की त्यास शृत किंवा काढा म्हणावे असे नमूद केले आहे. याच ग्रंथात पन्नास महाकषायांचे वर्णन विविध रोगांवर उपाय म्हणून केले आहे. वैदिक काळात आयुर्वेद गुरुकुल पद्धतीने शिकवला जात होता. वैद्य ताज्या वनस्पतीचा वापर करून लगेच रुग्णाला देत असत. हे कल्प ताजे असल्याने त्याचा तत्काळ परिणाम होत असे. मात्र बदलत्या काळानुसार ताजी औषधी आयत्या वेळी उपलब्ध होणे शक्य होईनासे झाले. याकरता शुष्क द्रव्यांचा वापर कसा करावा याचे शास्त्र निर्देश त्या काळात निर्माण झालेल्या ग्रंथात आढळतात.ओले वा शुष्क औषधी द्रव्य घेऊन ठेचून वा भरड करून द्रव (पाणी) पदार्थात उकळून केलेल्या प्रकारास श्रृत किंवा काढा म्हणावे, असे चरक संहितेमध्ये म्हटले आहे. शारंगधर संहिता ग्रंथात औषधीकरण विस्ताराने वर्णन केले आहे. त्यात काढा / क्वाथ ही कल्पना विस्तृतपणे वर्णन केली आहे. त्यानुसार एका मातीच्या पात्रामध्ये एक भाग औषधी द्रव्य घ्यावे. त्यात सोळा भाग पाणी घालून मंदाग्नीवर उकळत ठेवावे. एक चतुर्थांश भाग काढा राहिल्यावर गाळून घ्यावे व सुखोष्ण असताना सेवन करावे.यात औषधीच्या स्वभाव सापेक्षतेने खालील प्रकार किंवा भेद आहेत.मृदू औषधी द्रव असल्यास चारपट पाणी घालावे.कठीण द्रव्य असल्यास आठपट पाणी घालावे.अत्यंत कठीण औषधी द्रव्य असल्यास सोळापट पाणी घालून काढा करावा, असे निर्देश आहेत.काढा करताना झाकण न लावता करावा. झाकण लावल्यास काढा पचायला जड होतो.आयुर्वेदानुसार काढ्यांचे प्रकारआयुर्वेद ग्रंथात काढ्यांचे कर्मानुरूप पाचन, दीपन (अग्नी दीपन करणारा), शोधन (शरीरात वाढलेले दोष बाहेर काढणारा), शमन (शरीरातील विषम दोष सम करणारा), तर्पण (देह घटकांना तुप्त करणारा), क्लेदन (शरीर मध्ये द्रविभाव उत्पन्न करणारा) आणि शोषण असे सात प्रकार वर्णन केलेले आहेत.पाचन व शोधन प्रकारचे काढे करताना काढा एक चतुर्थांश होईपर्यंत आटवावा, असे नमूद केले आहे . (संदर्भः शारंगधर संहिता मध्यम खंड अध्याय-२) ताजा काढा एकच दिवस टिकतो. अलीकडच्या काळात काढा प्रभावी, उपयुक्त, टिकाऊ होण्याच्या दृष्टीने प्रवाही क्वाथ ही संकल्पना पुढे आली. या पद्धतीमध्ये, काढा करून त्यात मधुर द्रव्य मिसळून संधान करून आसवारिष्ट पद्धतीने प्रवाही क्वाथ बनवला जातो ..अनेक औषधी कल्पना तयार करताना काढा प्रथम बनवला जातो. उदाहरणार्थ,रसक्रिया (काढा आटवून केलेली घन वटी)गुग्गुळ कल्प (यात गुटी कल्पनेमध्ये काढे आटवून पुढे गुग्गुळ कल्प तयार करतात.)गुटी वटी (काही गोळ्या बनवताना औषधी वनस्पतीच्या काढ्यामध्ये आधी त्यांची द्रव्ये घोटली जातात, त्याला भावना असे म्हणतात.)अवलेह (अवलेह म्हणजे चाटून खाण्याचे औषध. उदाहरणार्थ, च्यवनप्राश)आसवआरिष्टक्षीर पाक (दुधाचा काढा)औषधी तूप व तेलेसिरपअनेक औषधांसोबत काही काढे अनुपान म्हणून दिले जातात.काढ्याचे तत्त्व वापरून केलेल्या काही अन्न कल्पना -यवागू (मुगाचे कढण)पेजकांजी इत्यादीकाही औषधी खनिज द्रव्य किंवा औषधीचे शोधन (शुद्धीकरण) करण्यासाठी काढ्यांचा वापर केला जातो.कुलीथ कांजीअडुळसा काढात्रिफळा काढापंचकर्म ही आयुर्वेदाची एक उपचार पद्धती आहे. त्यात काढ्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, वमन क्रियेसाठी ज्येष्ठमधाचा काढा वापरला जातो तर बस्तिसाठी दशमूल काढा उपयुक्त ठरतो. काही नेत्र विकार आणि व्रण यावर धावन (डोळे धुणे व जखम धुणे) करण्यासाठी त्रिफळासारख्या द्रव्यांचा काढा वापरला जातो. तसेच काही विशिष्ट व्याधींमध्ये परिषेक (कोमट काढ्याचे सिंचन) वापरतात.चिकित्सेत काढा वापरण्याचे फायदेकाढा हा जल महाभूत प्रधान असल्याने शरीरात लवकर शोषला जातो, त्यामुळे प्रभावी असतो.काढा करताना घेण्याची काळजीकाढ्याचे पात्र जाड बुडाचे असावे.काढ्याचे द्रव्य भरड असावे.काढ्यात आंबट पदार्थ असतील तर काढा शक्यतो मातीच्या / स्टीलच्या पात्रात करावा.जास्त करपलेला शिळा काढा वापरू नये.पात्र कळकणारे असू नये.काढ्याची गुणवत्ता आणि चव वाढवण्यासाठी बाहेरून काही द्रव्य काढ्यामध्ये घालतात त्याला प्रक्षेप असे म्हणतात.रोगानुरूप साखरेचे प्रमाण(शारंगधर संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे)वातज रोगामध्ये १/४ भागपित्तज व्याधीमध्ये १/८ भागकफज व्याधीमध्ये १/१६ भागरोगानुरूप मधाचे प्रमाणकफज व्याधीमध्ये १/४ भागपित्तज व्याधीमध्ये १/८ भागवातज व्याधीमध्ये १/१६ भागजिरे, मीठ, हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी यासारखी द्रव्ये ३ ग्रॅमघातली जातात. तूप, गुळाचे प्रमाण १२ ग्रॅमपर्यंत (१ कर्ष)रोगानुरूप व काढ्याचा पाठ (फॉर्म्युला) कोणता आहे, यावरठरते..साधारण ६० ते ७० वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शहरांमध्ये आणि गाव-खेड्यामध्ये काढे वैद्य असायचे. त्यात काही परंपरा होत्या. त्या परंपरांमध्ये वैद्य रुग्णाला काढ्याच्या पुड्या बांधून देत व त्याची मात्रा (प्रमाण) सांगत. रुग्ण त्याप्रमाणे काढे सेवन करून बरा होत असे. सध्याच्या युगात आयुर्वेदाच्या सिद्धांताला अनुसरून नवीन तंत्रज्ञान वापरून काही फार्मसी प्रवाही क्वाथ तयार करतात. त्यादेखील ितक्याच प्रभावी आहेत. शिवाय, अशा प्रकारचा काढा टिकतोदेखील.काढा द्रवरूप असल्याने बाटलीत ठेवावा लागतो. काहीवेळा बाटली सोबत ठेवणे सोईस्कर नसते. त्याला पर्याय म्हणून या काढ्यामधील औषधी द्रव्यांचा घनसार (extract) करून वापरतात. उदाहरणार्थ वरुणादि कषाय घन वटी.अनेक आजारांमध्ये अशाप्रकारे उपचार म्हणून काढे वापरता येतात. काही कल्प (औषध) बनवताना काढे उपयोगी पडतात. बाह्य उपचारासाठी (ताजा काढा वापरतात) आणि पोटातून असा काढ्याचा उपयोग होतो. ताजा काढा सहज करता येतो. काही वर्षांपूर्वी आलेल्या साथीच्या रोगात सुंठ, तुळस, मिरे, दालचिनी इत्यादी पासून बनवलेल्या काढ्याने अनेक लोकांना फायदा झाला, हे विसरून चालणार नाही. आयुर्वेदातील प्रत्येक ग्रंथात अनेक रोगाधिकारात काढे वर्णन केले आहेतच. आजच्या परिभाषेत काढे हे बहुगुणी आहेत. म्हणूनच, आयुर्वेदातील काढा /कषाय या औषधी कल्पनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.(डॉ. योगेश प्रभुणे पुणेस्थित आयुर्वेदाचार्य असून आयुर्वेददर्शन, संस्कृत या विषयांत पारंगत आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.