वैद्य रेणुका महेश कुलकर्णी
सकाळीच क्लिनिकला ३२ वर्षांची एक रुग्णा सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन आली, तिचा गर्भपात झाला होता. लग्नानंतर तिला पहिल्यांदाच दिवस राहिल्याने घरात सर्वजण आनंदी होते. अडीच महिने पूर्ण झाले, सोनोग्राफीमध्ये गर्भ दिसला पण त्याच्या हृदयाचे ठोके नव्हते. एक आठवड्याने परत सोनोग्राफी करू, असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. नंतर असे झाल्याने साहजिकच तिला खूप दुःख झाले होते.
तिची केस पाहिली. तिची मासिक पाळी अनियमित होती. गर्भधारणेपूर्वीच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये पीसीओडी असे नोंदवलेले होते. पीसीओडी म्हणजे पॉलिसीस्टिक ओवरी सिंड्रोम, थोडक्यात अनियमित रजप्रवृत्ती. ही हल्ली खूप जास्त प्रमाणात वाढलेली समस्या आहे.