Diet In Ayurveda : आयुर्वेदाने चौरस आहाराला महत्त्व दिले; गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू, खारट अशा सर्व चवींनी युक्त आहार आवश्यक
आयुर्वेदामध्ये आहाराचे महत्त्व पटवून दिले आहे, जो चौरस, पोषक आणि योग्य प्रकारे पचणारा असावा. आहारातील विविध नियमांचे पालन केल्यास निरोगी जीवन आणि आरोग्य टिकवता येते.
आयुर्वेदाने चौरस आहाराला महत्त्व दिले आहे. आहार पांचभौतिक असावा, षड्विध रसात्मक म्हणजे गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू, खारट अशा सर्व चवींनी युक्त असावा, तसेच आहारात उष्ण व थंड पदार्थ योग्य प्रमाणात असावेत.