डॉ. अविनाश भोंडवे आज अनेक रजोनिवृत्त स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस असण्याची शक्यता असू शकते. अनेकदा स्त्रियांना घरात किरकोळ अपघात होऊन हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपले घर अशा अपघातांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही खबरदारी घ्यावी..बालपण, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था हे मानवी जीवनातले अटळ टप्पे आहेत. या टप्प्यात प्रत्येकाच्या शरीराच्या बाह्यरुपामध्ये तर कायापालट होतोच, पण शरीराच्या अंतर्गत रचनेत आणि चयापचय क्रियांमध्येदेखील लक्षणीय परिवर्तन होत जाते. हे बदल पुरुषांमध्ये होतात, तसेच स्त्रियांमध्येही घडतात. स्त्रियांच्या शारीरिक बदलांमध्ये काही हार्मोन्सची, विशेषतः एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची भूमिका खूप महत्त्वाची असते.स्त्रियांच्या बीजांडकोशामधून (ओव्हरीजमधून) हे हार्मोन्स स्रवत असतात. या हार्मोन्सच्या मुख्य कार्यांमध्ये लैंगिक अवयवांचा विकास व कार्याचे नियंत्रण यांचा समावेश असतो. या हार्मोन्समुळेच मुली वयात आल्यानंतर त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल प्रकर्षाने जाणवू लागतात. या बदलांमध्ये मासिक पाळी येणे, गरोदर राहणे, रजोनिवृती अशा स्त्रीजीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश असतो.यांपैकी रजोनिवृत्तीनंतर शरीरातील हाडांची घनता कमी होण्याचा, म्हणजेच ऑस्टियोपोरोसिसचा विकार होण्याची शक्यता असते. ऑस्टियोपोरोसिस केवळ रजोनिवृत्तीनंतरच नव्हे, तर मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या काही वर्ष आधीपासून (पेरिमेनॉपॉज) जाणवू लागतो. आपल्या देशात ऑस्टियोपोरोसिस हा विकार अजूनही दुर्लक्षित आहे.ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?संख्यात्मक आणि आकारमानाने वाढ होणाऱ्या पेशीसमूहांपासून मानवी हाडे तयार होतात. कोणत्याही हाडामध्ये एक काहीसे रुंद बाह्यकवच असते. याला कॉर्टेक्स म्हणतात. त्याच्या आत असलेला भाग एखाद्या स्पंजसारखा छोट्या छिद्रांनी तयार झालेला असतो. हाडाच्या अंतर्गत भागातील स्पंजसारख्या भागामध्ये असलेली छिद्रे ऑस्टियोपोरोसिसमध्ये मोठ्या संख्येने वाढतात. त्यामुळे हाडांची अंतर्गत रचना कमकुवत होते.सातत्याने होणाऱ्या हालचालींमुळे आपल्या शरीरातील हाडांची झीज होत असते. बालपणापासून तारुण्यापर्यंत होणारी ही झीज भरून येण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे मुलींची उंची आणि वजन वाढत असते. वयाच्या पंचविशीनंतर तिशी-पस्तिशीपर्यंत हा वेग समसमान असतो. परंतु त्यानंतर हाडांची झीज जास्त होत राहते आणि वयोमानानुसार झीज भरून येण्याचे प्रमाण कमी होत जाते. परिणामतः स्त्रियांच्या हाडांची एकूण घनता हळूहळू कमी होत राहते आणि ती एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचली की, त्यांना ऑस्टियोपोरोसिस होतो..पेरिमेनोपॉज आणि रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेन स्रवण्याचेप्रमाण कमी होते. त्यातून ऑस्टियोपोरोसिस विकसित होऊ लागतो. भारतीय स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होण्याचा वयोगट सर्वसाधारणपणे ४५ ते ५० वर्षे आहे. एस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता पेरिमेनॉपॉज काळातच सुरू होत असल्यामुळे, भारतीय महिलांमध्येवयाच्या ४२ ते ४५ वर्षे या काळातच हाडांची घनता कमी होऊ लागते आणि ऑस्टिओपोरॉसिसची सुरुवात होते. वयाच्या ५०व्या वर्षानंतर त्याची लक्षणे प्रकर्षाने जाणवू लागतात. वेळीच योग्य उपचार न केल्यास उत्तरोत्तर त्याचे त्रासदायक आणि गंभीर परिणाम जाणवू लागतात.लक्षणेतसे पाहिले, तर ऑस्टियोपोरोसिस हा एकप्रकारे ‘मूक विकार’ असतो. कारण हाडांची घनता कमी होऊ लागते त्या काळात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. जेव्हा ही घनता कमालीची कमी होते, तेव्हाच लक्षणे जाणवायला लागतात. सतत कंबर दुखणे, पायांची हाडे, नडग्या, पाठीचे खवाटे, बरगड्या, दंड, हातापायांची; थोडक्यात शरीरातील सारी हाडे दुखू लागतात.ऑस्टियोपोरोसिस दीर्घकाळ राहिल्यासछोट्याशा आघाताने विशेषतः मांडीच्या, हातांच्या किंवा कंबरेच्या हाडांना फ्रॅक्चर होणे,फ्रॅक्चर्स जुळायला खूप वेळ लागणे किंवा ती न जुळणे,पाठीला कुबड येणे किंवा कंबरेमध्ये बाक येणे,मणक्यांच्या हाडांची झीज होऊन उंची कमी होणे हे परिणाम होतात.ऑस्टियोपोरोसिस कोणाला होऊ शकतो?५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा चार पट जास्त असते. महिलांची हाडे पुरुषांपेक्षा कमी वस्तुमानाची आणि पातळ असतात. तसेच स्त्रियांचे सरासरी आयुर्मान अधिक असल्याने त्यांना ऑस्टियोपोरोसिसचा धोका जास्त असतो.काही संशोधनांत आढळून आले आहे, की कॉकेशियन आणि आशियाई महिलांमध्ये ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे, कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी स्त्रियांपेक्षा कॉकेशियन स्त्रियांमध्ये खुब्याच्या हाडांचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता दुप्पट असते. गौरवर्णीय स्त्रियांमध्ये खुब्याच्या हाडाच्या फ्रॅक्चरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते.ठेंगण्या आणि सडपातळ स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो. तसेच सडपातळ आणि ठेंगण्या पुरुषांनाही हा विकार होण्याची शक्यता अधिक असते.एखाद्या महिलेच्या आईला, आजीला ऑस्टियोपोरोसिसची चिन्हे आढळली असतील, तर तिलाही हा आजार होण्याचा धोका जास्त असू शकतो.व्यक्तिगत पूर्व इतिहास असेल, तर ऑस्टियोपोरोसिसचा धोका असतो.काही औषधे, स्टेरॉइड्सचा दीर्घकाळ वापर केल्यास ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो.कर्करोग, अर्धांगवायूसारख्या आजारांचा इतिहास असल्यास ऑस्टियोपोरोसिसचाही धोका लक्षात घ्यावा लागतो..निदानहातापायांच्या लांब हाडांच्या नेहमीच्या साध्या एक्स-रेमध्येही हाडांची घनता कळू शकते. परंतु बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) एक्स-रेद्वारे केलेली चाचणी हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टियोपोरोसिसबद्दल अचूक माहिती देऊ शकते. यामध्ये अगदी कमी प्रमाणात एक्स-रे रेडिएशन वापरले जाते. सर्वसाधारणपणे, ६५ किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला, एकापेक्षा जास्त जोखीम घटक असलेल्या महिला, रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये ही चाचणी केली जाते.उपचारऑस्टियोपोरोसिसचे निदान झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये अॅलेन्ड्रोनेट, इबॅन्ड्रोनेट, रॅलोक्सिफेन, रिझोन्ड्रोनेट आणि झोलेड्रॉनिक ॲसिडसारखी औषधे, कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व यांचा समावेश असतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असलेल्या स्त्रियांना डेनोसुमॅब इंजेक्शन दिले जाते, कारण इतर औषधे निरुपयोगी ठरतात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीला पर्याय म्हणून हाडांची पुनर्निर्मिती करणारी अबालोपॅरेटाइड, टेरिपॅरेटाइड, इंजेक्शन्स आणि पॅराथायरॉइड हार्मोनवरील औषधे वापरली जातात.हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ः रुग्णांमध्ये ऑस्टियोपोरोसिसला कारणीभूत ठरणाऱ्या हाडांची झीज खूप वाढली असेल, तर ती रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एस्ट्रोजेन हार्मोन वापरून, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी उपयुक्त मानली जाते. तथापि, केवळ ऑस्टियोपोरोसिसच्या प्रतिबंधासाठी किंवा रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वापरू नये.प्रतिबंधक उपायव्यायाम ः नियमित व्यायामामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात, परिणामतः हाडांची झीज टळते. व्यायामामुळे क्रियाशीलता वाढून व्यक्ती सक्रिय राहते. ऑस्टियोपोरोसिस टाळण्यासाठी आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा वजन उचलण्याचे व्यायाम, सर्वोत्तम मानले जातात; परंतु चालणे, जॉगिंग, टेनिस खेळणे आणि नृत्य करणे अशा प्रकारचे ॲरोबिक व्यायाम आणि खेळदेखील उपयुक्त मानले जातात. कॅल्शियम ः आहारामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असलेल्या अन्नपदार्थांचा नियमितपणे समावेश असावा. कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. काटे जास्त असणाऱ्या समुद्री माशांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. शाकाहारी स्त्रियांनी दुधाप्रमाणेच गडद हिरव्या पालेभाज्या, संत्र्याचा कॅल्शियम-फोर्टिफाइड रस, कॅल्शियम-फोर्टिफाइड पीठ अशा पदार्थांवर भर द्यावा. लहानपणापासूनच पुरेसे कॅल्शियम मिळाल्याने हाडे मजबूत होण्यास आणि टिकण्यास मदत होते. ऑस्टियोपोरोसिसचा प्रतिबंध होण्यासाठी तरुण महिलांना दररोज १००० मिलीग्रॅम, तर रजोनिवृत्तीनंतर दररोज १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम मिळणे आवश्यक असते. आहारातून कॅल्शियम मिळण्याची शक्यता नसल्यास पूरक म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. यासाठी कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सायट्रेट हे कॅल्शियम सप्लिमेंटचे चांगले प्रकार आहेत. ५१ वर्षे वयानंतर, म्हणजे मेनोपॉजच्या काळात दररोज २ हजार मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅल्शियम घेऊ नये. ड जीवनसत्त्व ः आहारावाटे किंवा पूरक औषधांवाटे घेतलेले कॅल्शियम शरीरात शोषले जाण्यासाठी ड जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. सकाळी १० ते ११ या काळात दररोज २० मिनिटे शरीराला ऊन मिळाल्यास शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व तयार होते. आहारामध्ये अंडी, मासे, तृणधान्ये ड जीवनसत्त्वाने फॉर्टिफाईड केलेले दूध, सीताफळ, रामफळ अशा फळांमधून ड जीवनसत्त्व मिळते. ५१ ते ७० या वयोगटातील महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात दररोज ६०० युनिट्स ड जीवनसत्त्व मिळणे आवश्यक असते. दररोज ४ हजार युनिटपेक्षा जास्त प्रमाणात ड जीवनसत्त्व घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. धोकादायक औषधे ः स्टेरॉइड्स, अपस्मार, कर्करोग, रक्त पातळ करणारी औषधे, थायरॉईड आजारावरील औषधे अशी ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढवणारी औषधे घ्यावी लागत असल्यास हाडांची झीज जास्त प्रमाणात होऊ शकते. यापैकी कोणत्याही प्रकारची औषधे घेतली जात असल्यास आहार, जीवनशैलीतील बदल करणे, तसेच अतिरिक्त औषधोपचार याद्वारे हाडांच्या झीज कमी करावी लागणे अनिवार्य ठरते. इतर प्रतिबंधात्मक पावले ः अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान टाळावे. मद्यपान आणि धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये ऑस्टियोपोरोसिसची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही व्यसने होत असल्यास त्यांना पूर्णविराम द्यावा..आज अनेक रजोनिवृत्त स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिस असण्याची शक्यता असू शकते. अनेकदा स्त्रियांना घरात किरकोळ अपघात होऊन हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपले घर अशा अपघातांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही खबरदारी घ्यावी.बाथरूममध्ये अँटिस्किड फरशा वापराव्यात. घरामध्ये फरशीवर सैल गालिचे घालू नयेत. घरातील वस्तू, कपडे फरशीवर पडलेले नसावेत. टब आणि शॉवरच्या भिंतींवर आणि शौचालयाच्या बाजूला हाताने पकडण्याजोगा बार बसवावा. घरात योग्य प्रकाशव्यवस्था असावी, कोठेही अंधार नसावा. जिन्यांना मजबूत कठडे असावेत.सन २०२२च्या लोकसंख्या आकडेवारीनुसार भारतात साधारणतः ५० वर्षांवरील स्त्रियांची संख्या १२ ते १५ कोटी आहे. ही संख्या रजोनिवृत्त स्त्रियांची मानली, तर ऑस्टियोपोरोसिस असणाऱ्या महिलांची संख्या तितकीच जास्त असण्याची शक्यता आहे. साहजिकच याविषयी जनसामान्यात सतर्कता वाढवण्याची आवश्यकता आहे.(डॉ. अविनाश भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशन कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स राष्ट्रीय शाखेचे माजी डीन आहेत.)