स्वप्ना सानेब्यूटी थेरपिस्टकडून स्वतःचे स्किन केअर रूटीन प्लॅन करून घ्यावे, आणि त्वचेनुसार कोणते प्रॉडक्ट सूट होईल ते बघावे. प्रॉडक्टची नीट खात्री करून ते तुमच्या त्वचेसाठी सेफ आहे ना हे पाहा. आणि महत्त्वाचे म्हणजे बजेट फ्रेंडली आहे ना, हेसुद्धा पाहावे..स्किन आणि हेअर केअरसाठी टीव्हीवर कॉस्मेटिक्सच्या अनेक जाहिराती येत असतात. त्या इतक्या प्रभावी असतात, की कालांतराने वाटायला लागते, खरेच ही कॉस्मेटिक्स आपण वापरली तर त्वचा एकदम माधुरी, ऐश्वर्या, आलिया अन् क्रितीसारखी सुंदर नितळ अन् केस सिल्की होतील. एखाद्या मॉडेलसारखा फील येईल. फक्त टेलिव्हिजनच नव्हे तर सोशल मीडियावरदेखील आपण बघत असलेल्या रील्समध्ये कुठल्या न कुठल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची जाहिरात असते. आयुर्वेदिक, केमिकल फ्री, ऑरगॅनिक, हर्बल असे प्रकार; त्यावर बऱ्याच ऑफर्सची प्रलोभनेही असतात - एकावर एक फ्री, प्राईस ड्रॉप डील, कॉम्बो ऑफर वगैरे वगैरे. पण ही प्रलोभने असतात हे कायम लक्षात ठेवायला हवे.अलीकडे ऑनलाइन विश्व फारच विस्तारले आहे. त्या ऑनलाइन विश्वात सतत दिसणाऱ्या ॲड्स बघून कधीतरी हे प्रॉडक्ट्स घेण्याचा मोह होतोच. अनेकवेळा ते प्रॉडक्ट मागवल्यावर कळते, की अरे हे लावल्यावर तर स्किन तेलकट होतेय किंवा रॅश येतोय किंवा घाम खूप येतोय किंवा स्किन ड्रायच राहतेय. केसांसाठी तेल मागवल्यावर त्याचा इफेक्ट व्हायला तीन महिने तरी वाट बघावी लागते. तेवढा पेशन्सच नसतो आपल्याकडे. त्यामुळे मग प्रॉडक्ट सूट झाले नाही, असा समज होतो. सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्टन्ट हव्या असतात, तसंच या प्रॉडक्ट्सचा इफेक्टही इन्स्टन्ट व्हावा असा आग्रह असतो; त्वचेचा ग्लो असो किंवा केस गळती थांबणे असो. पण प्रॉडक्ट वापरल्यानंतर लगेच फरक पडतो, तो फक्त जाहिरातीतच, हे लक्षात असू द्या! .आपल्यापैकी बरेचजण आपली त्वचा आणि आरोग्याबद्दल जागरूक आहेत. पण कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर आणि त्याबद्दल अजूनही म्हणावी तेवढी जागरूकता नाही, असे मला वाटते. आणखी एका मार्गाने आपण प्रलोभनांना बळी पडतो. मैत्रिणीने वापरलेल्या शाम्पूने तिचे केस खूप सॉफ्ट झाले आणि केसगळतीही थांबली म्हणून मीपण तोच शाम्पू वापरून बघते, ही मानसिकता चुकीची आहे. तुमच्या मैत्रिणीला सूट झालेली कॉस्मेटिक क्रीम्स तुम्हालाही सूट होतील असे नाही. ह्याचे कारण सगळ्यांची त्वचा एकसारखी नसते. कोणाची तेलकट, कोणाची कोरडी तर कोणाची नॉर्मल असते. तसेच प्रत्येकाचे स्किन टेक्स्चर, पिंपल्स, हायड्रेशन लेव्हल, पिगमेंटेशन, सुरकुत्या असे अनेक वेगवेगळे त्वचेशी निगडित प्रॉब्लेम्सही वेगळे असतात.ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेता, आपली त्वचा कशी आहे, काही त्वचेशी संबंधित काही समस्या आहे का, एखाद्या घटकाची ॲलर्जी तर नाही ना, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून स्वतःसाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स निवडायला हवेत.कॉस्मेटिक्स निवडीच्या टिप्स लक्षात घेऊनही जर कन्फ्युजन होत असेल, तर एक सोपा उपाय म्हणजे आपल्या ब्यूटी थेरपिस्टकडून स्वतःचे स्किन केअर रूटीन प्लॅन करून घ्यावे, आणि त्वचेनुसार कोणते प्रॉडक्ट सूट होईल ते बघावे. तज्ज्ञांकडून तर सल्ला घ्याच, पण त्याचबरोबर स्वतःही जागरूक राहावे. वरील सांगितल्याप्रमाणे प्रॉडक्टची नीट खात्री करून ते तुमच्या त्वचेसाठी सेफ आहे ना हे पाहा. आणि महत्त्वाचे म्हणजे बजेट फ्रेंडली आहे ना, हेसुद्धा पाहावे.. .कॉस्मेटिक्स कशी निवडायची?स्किन टाइप ः ड्राय, नॉर्मल, ऑईली, पिंपल्स, डिहायड्रेट, कॉम्बिनेशन असे स्किनचे विविध प्रकार असतात. मॉइस्चरायझर विकत घेताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार घ्यावे लागेल. ड्राय त्वचेसाठी असलेले लोशन ऑईली त्वचेला चालणार नाही, कारण ऑईली त्वचेला ड्राय त्वचेसाठी असलेले लोशन लावले तर त्वचा आणखी जास्त तेलकट जाणवेल. तसेच ऑईली त्वचेचे प्रॉडक्ट्स ड्राय आणि एजिंग स्किनला चालणार नाहीच. फेस पॅकदेखील प्रत्येक स्किन टाइपनुसार वेगवेगळे मिळतात. ड्राय त्वचा आणि एजिंग त्वचेसाठी नरीशिंग आणि नॉन ड्रायिंग पॅक लावता येतील. पिंपल्ससाठी क्ले-बेस्ड, तर पिगमेंटेड स्किनसाठी स्किन टोन इव्हन करणारे घटक वापरलेले पॅक उपलब्ध असतात. त्यामुळे स्किन टाइप लक्षात घेऊन प्रॉडक्ट निवडावे.प्रॉडक्टमधील घटक ः प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे त्यातील मुख्य घटक दिलेले असतात. शिवाय, ते प्रॉडक्ट आयुर्वेदिक किंवा हर्बल असेल, तर तसेही नमूद केलेले असते. त्यात जे घटक असतात, त्यात पॅराबेससारखे प्रीझर्व्हेटिव्ह असतील किंवा प्रॉडक्ट खूप जास्त सिलिकॉन बेस्ड असतील, किंवा सल्फेटचे प्रमाण जास्त असेल, तर ते प्रॉडक्ट घेण्याचे टाळावे. हर्बल आणि आयुर्वेदिक ॲक्टिव्ह्स असलेले प्रॉडक्ट वापरावे.रिव्ह्यूज पाहा ः प्रॉडक्टवर नॉन टॉक्सिक, नॉन कोमेडोजेनिक, डरमॅटोलॉजिकली टेस्टेड असे उल्लेख आहेत ना, हे तपासावे. प्रॉडक्टचा ब्रॅण्ड, त्याबद्दलचे रिव्ह्यू तपासावेत. ब्रॅण्ड कोणता आहे, त्याचे प्रॉडक्शन कुठे होते, हेदेखील प्रॉडक्टच्या मागे लिहिलेले असते, ते जरूर वाचावे. शक्य असल्यास प्रॉडक्ट घ्यायच्या आधी त्याचे टेस्टर असतील तर ते ट्राय करून बघावेत.(स्वप्ना साने कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ब्यूटी थेरपिस्ट अाहेत.)--------------------------.Share Market: परदेशी संस्था पुन्हा जोमाने आखाड्यात न आल्याने शेअर बाजाराचे मूल्यांकन चढे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.