डॉ. सदानंद मोरे
शेती हा मानवयुगाचा प्रारंभबिंदू मानता येत नाही. मानवयुगाच्या प्रारंभासाठी खरा उमेदवार आहे एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांती. या क्रांतीमुळे इतिहासात पहिल्यांदाच ज्याला खऱ्या अर्थाने यंत्र म्हणता येईल अशी वस्तू वाफेच्या इंजिनाच्या रूपात दाखल झाली. खरेतर तिच्यामुळे क्रांतीला सुरुवात झाली असेही म्हणता येईल.