प्रियांका राऊत
सध्याच्या काळातील ट्रेंडिंग उपकरणं वेळ वाचवण्यासाठी, स्वयंपाकाचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी आणि एकंदर स्वयंपाकघरातली कामं सोपी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘किचन’. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिला त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अधिकाधिक व्यग्र होत आहेत. त्यामुळे किचनमधले तरी काम सुलभ व्हावे म्हणून नवीन, अद्ययावत अप्लायन्सेसची मागणी वाढत आहे. या अप्लायन्सेसमुळे किचनमधल्या कामांचा वेग वाढण्यास मदत होत आहे. विशेषतः महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या आणि किचनमध्ये सोयीस्कर ठरणाऱ्या काही ट्रेंडिंग उपकरणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही उपकरणं वेळ वाचवण्यासाठी, स्वयंपाकाचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी आणि एकंदर स्वयंपाकघरातली कामं सोपी करण्यासाठी महत्त्वाची ठरतात.