देशात स्टार्टअप्समध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात मुंबईने या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ८३ टक्के निधी मिळविला. पुण्याला १२ तर, ठाण्याला तीन टक्के निधीवरच समाधान मानावे लागले. मुंबईतील प्रमुख गुंतवणुकीत झेप्टो, एपीआय होल्डिंग्ज अशांचा समावेश आहे. तर, पुण्यात फिनटेक, अॅग्री-टेक, आणि ईव्ही क्षेत्रात गुंतवणूक झाल्याचे दिसते. ठाण्यात Infra.Marketने विशेष फंडिंग मिळवले.