डॉ. श्रीकांत कार्लेकरॲमेझॉन अपरिवर्तनीय अशा चरम बिंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. जंगल कायम ठेवण्यापेक्षा ते तोडणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर आहे, असे वाटणे हीच ॲमेझॉनमधील मुख्य समस्या आहे. आणि तीच या सगळ्या नाशाला कारणीभूत आहे. .प्रादेशिक पर्जन्यमान आणि जंगलतोड यावर होणाऱ्या जागतिक तापमानवाढीच्या परिणामांमुळे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन वर्षावनांचा झपाट्याने नाश होत आहे.ही वर्षावने आता आंशिक पातळीवर किंवा काही प्रदेशांमध्ये संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे एक नवीन संशोधन सांगते. या संशोधनाने या जंगलातील वनस्पतींच्या अस्तित्वावर ताण निर्माण करणाऱ्या घटकांच्या संभाव्य मर्यादा ओळखल्या आहेत. या घटकांचा एकत्रित परिणाम होऊन ॲमेझॉन जंगलाने आता अस्तित्वाची परिसीमा गाठायला सुरुवात केली असावी, असे हे संशोधन सुचविते.शेती, लाकूड, रस्ते, जलविद्युत बंधारे, खाणकाम, घरबांधणी किंवा इतर विकासासाठी साफसफाई करून पर्जन्यवनांचे प्रचंड क्षेत्र आज नष्ट केले जाते आहे. हे सगळे घटक इथल्या परिसंस्थेत (इकोसिस्टीममध्ये) ताणतणाव निर्माण करणारे मुख्य घटक आहेत.ॲमेझॉन जंगलातील वनप्रणाली लवकरच तिच्या अस्तित्वाच्या चरम बिंदूवर पोहोचेल आणि त्यामुळे तेथील पर्यावरणाचे संतुलन अक्षरशः ढासळून जाईल, असे सांगणारे हे संशोधन ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सांता कॅटरिना आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे.संशोधनाच्या प्रमुख लेखिका बर्नार्डो फ्लोरेस सांगतात, ॲमेझॉनच्या गाभा प्रदेशात (Core) वनप्रणालीत वाढत जाणारे व्यत्यय फारसे वेगळे नाहीत. मात्र जर हे व्यत्यय सातत्याने वाढत राहिले, तर याआधी लवचीक मानल्या जाणाऱ्या पश्चिम आणि मध्य ॲमेझॉनच्या आर्द्र भागांत असणाऱ्या परिसंस्थांत अनपेक्षित बदल दिसू शकतात. बदल होऊ लागलेल्या जंगलांत पूर्ववत होण्यास सक्षम असणारे काही जंगलभाग आहेत, परंतु तरीही ते हळूहळू नष्ट होऊ लागले आहेत व बांबू आणि वेली यांसारख्या संधीसाधू वनस्पतींचे वर्चस्व तिथे वाढू लागले आहे.जागतिक हवामानाच्या संदर्भात ॲमेझॉनची भूमिका आणि सहभाग महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संशोधनाच्या अशा निष्कर्षांची महतीही तितकीच मोठी आहे. ॲमेझॉनच्या जंगलातील झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन साठवतात. जंगलांच्या हानीमुळे तो कमी झाला तर जागतिक तापमानवृद्धीला अधिक चालना मिळेल. .संशोधनाचे सह-लेखक, बर्मिंगहॅम इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट रिसर्चचे डॉ. ॲड्रियान एस्क्वेल-म्युएलबर्ट यांच्या मते, वाढणारे तापमान, तीव्र दुष्काळ आणि आगींमुळे जंगलाचे कार्य कसे प्रभावित होते हे स्पष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आता लक्षात आल्या आहेत आणि कोणत्या वृक्षप्रजाती सगळ्या वनव्यवस्थेला सामावून घेऊ शकतात हेही लक्षात आले आहे. जागतिक हवामानबदलाच्या सध्याच्या वेगामुळे संशोधकांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते आहे.ॲमेझॉन जंगलांच्या लवचीकतेला जैवविविधता आणि स्थानिक समुदायांच्या भूमिकांचे योगदान किती आहे, याचेही या अभ्यासात परीक्षण करण्यात आले. अस्तित्वाच्या परिसीमेपर्यंत पोहोचण्यापासून ॲमेझॉनच्या जंगलांचे रक्षण करणे प्रामुख्याने स्थानिक आणि जागतिक प्रयत्नांच्या संयोजनावर अवलंबून असेल.यात जंगलतोड संपविण्यासाठी आणि पुनर्निर्माण क्षेत्रांचा विस्तार करण्यासाठी ॲमेझॉन नदी खोऱ्यातील ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना या देशांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. अर्थात त्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन थांबवण्याचे आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याचे जागतिक प्रयत्नही आवश्यक आहेत. .गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात दुबईत झालेल्या कॉप-२८ या हवामान परिषदेदरम्यान या अभ्यासाच्या संशोधन गटाने ॲमेझॉन नाशाच्या अंतिम सीमेवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक संस्थांनी कोणती पावले उचलावीत हे सुचविणाऱ्या धोरणांचा संच प्रकाशित केला आहे.जागतिक हवामानातील बदलांचे प्रमाण पाहता, गेल्या पासष्ट दशलक्ष वर्षांत अॅमेझॉनची ही जंगले आजपर्यंत तुलनेने ताण सहन करत राहिली आहेत. मात्र आता या प्रदेशाच्या अगदी मध्यवर्ती आणि दुर्गम भागांनाही तापमानवाढ, अतिदुष्काळ, जंगलतोड आणि आग अशा ताणतणावांचा अभूतपूर्व सामना करावा लागतो आहे. या अभ्यासांत ॲमेझॉनच्या जंगलातील पाण्यावर ताण आणणाऱ्या पाच प्रमुख घटकांबद्दलच्या उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण आणि त्या घटकाच्या संभाव्य मर्यादांचे (Thresholds) विश्लेषण केले गेले आहे. ज्या मर्यादा ओलांडल्या गेल्यास स्थानिक, प्रादेशिक किंवा अगदी जीवसंहती (Biome) पातळीवर जंगलाचा नाश होऊ शकतो त्यांचाही विचार या अभ्यासात केलेला आहे. वर्ष २०५०पर्यंत ॲमेझॉनची १० ते ४७ टक्के जंगले मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतील, असा अंदाज जंगलाचे संतुलन राखताना येणाऱ्या विविध व्यत्ययांची अभिक्षेत्रीय (Spatial) माहिती एकत्रित केल्यावर वर्तविण्यात आला आहे. त्यातून या जंगलातील परिसंस्थेत अनपेक्षित संक्रमणे होऊ शकतात आणि अर्थातच प्रादेशिक हवामान बदलाची संभाव्यताही वाढू शकते.ॲमेझॉनमधील विस्कळीत जंगलांची उदाहरणे वापरून तीन सर्वात उत्कृष्ट आणि भिन्न पर्यावरणीय परिस्थिती असलेल्या परिसंस्था शोधण्यात आल्या. ॲमेझॉनच्या जंगलातील मूळची क्लिष्टता भविष्यातील तिच्या अस्तित्वाच्या अनिश्चिततेत कशी भर घालू शकेल, याबद्दलही हे संशोधन मत प्रदर्शन करते. सध्याच्या मनुष्ययुगात या जंगलाला संवेदनक्षम ठेवणे हे हरितगृह वायू उत्सर्जन थांबविण्याच्या जागतिक प्रयत्नांप्रमाणेच इथली जंगलतोड थांबवण्यासाठी आणि परिसराची पुनर्स्थापना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्थानिक प्रयत्नांवर अवलंबून असेल, असेही या संशोधनात म्हटले आहे. .ॲमेझॉन जंगल ही परस्परसंबंध असलेल्या प्रजाती, परिसंस्था आणि मानवी संस्कृतींची एक जटिल प्रणाली आहे. ती जागतिक स्तरावर लोकांच्या कल्याणासाठी हातभार लावते. ॲमेझॉन जंगलात पृथ्वीवरील दहा टक्क्यांपेक्षा जास्त स्थलचर किंवा जमिनीवरील (Terrestrial) जैवविविधता आहे. या जंगलांत पंधरा ते वीस वर्षांच्या जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाइतका समतुल्य कार्बनचा साठा आहे. इथून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे प्रदेश थंड राहतो आणि त्याचा निव्वळ परिणाम जागतिक हवामान स्थिर होण्यास मदत करतो. या प्रदेशातील जंगलांमुळे इथे ५० टक्के पाऊस पडतो आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील आर्द्रतेसाठी तो महत्त्वपूर्ण आहे. याचमुळे इतर जीवसंहती इथे वाढू शकतात. इतका पाऊस नसता तर हा प्रदेश अधिक रखरखीत झाला असता आणि जंगलातील मृत्यूसंख्या मोठ्या भागांमध्ये वाढली असती.मुख्य प्रश्न आहे तो, एकविसाव्या शतकात ॲमेझॉन वनसंस्थेची मोठ्या प्रमाणावर पडझड प्रत्यक्षात होऊ शकेल का, आणि या पडझडीचा संबंध अस्तित्वाच्या एखाद्या विशिष्ट चरम बिंदूशी असेल का? तो सोडविण्यासाठी या अभ्यासात प्राचीन नोंदी, निरीक्षण सांख्यिकी आणि संपूर्ण परिसंस्थेवर तणाव निर्माण करणारे घटक या संदर्भात पुरावे एकत्रित केले गेले. ॲमेझॉन जंगलाला अस्तित्वाच्या परिसीमेकडे ढकलू शकणाऱ्या सर्व घटकांचे मूल्यांकन केले गेले. ॲमेझॉन जंगलातील विस्कळीत जंगलांच्या उदाहरणांवरून, पर्यायी स्थिरस्थितीकडे नेणाऱ्या सर्वात वाजवी परिसंस्थेचे विश्लेषण करून हवामान विभागांच्या आणि जमिनीच्या वापराच्या सीमा सध्याच्या मनुष्ययुगातील ॲमेझॉन वनप्रणालीत सुरक्षित अशा जागा दिसून येतील अशा प्रकारे निश्चित करण्यात आल्या. .कालपरत्वे पर्यावरणीय परिस्थितींमध्ये चढ-उतार होत असतात आणि त्यामुळे परिसंस्थेवर ताण येऊ शकतो (उदाहरणार्थ, वनस्पतींसाठी पाण्याची कमतरता). जेव्हा तणावपूर्ण परिस्थिती तीव्र होते, तेव्हा काही परिसंस्था त्यांची समतोल स्थिती हळूहळू बदलतात, तर काही परिसंस्था स्थिर स्थितीमध्ये एकदम अचानक बदल घडवून आणतात. ‘चरम बिंदू’ हे पर्यावरणीय ताणतणावाच्या स्थितीचे चिंताजनक मर्यादामूल्य आहे. एखाद्या लहानशा अडथळ्यामुळेही या परिसंस्थेत अचानक बदल होऊ शकतो. अशा प्रकारचे वर्तन ज्यामध्ये प्रणाली स्वमजबुतीकरण बदलाच्या टप्प्यात येते त्याला ‘चिंताजनक संक्रमण’ असे संबोधले जाते. परिसंस्था चरम बिंदूच्याजवळ येत असताना, समतोल साधण्याच्या निकट असतानाही अनेकदा लवचीकता गमावतात. परिसंस्थांसाठी चरम बिंदू ओलांडणे अनेकदा अपरिवर्तनीय असू शकते. ॲमेझॉन जंगलासारख्या उष्णकटिबंधीय स्थलीय परिसंस्था त्यादृष्टीने अतिशय संवेदनशील आहेत.ॲमेझॉन वनप्रणाली सेनोझोइक या भूशास्त्रीय युगात, म्हणजे ६५ दशलक्ष वर्षांपासून, दाट जंगलाने व्यापलेली आहे. सात दशलक्ष वर्षांपूर्वी, ॲमेझॉन नदीने पश्चिम ॲमेझॉनचा बराचसा भाग व्यापलेल्या मोठ्या पाणथळ प्रदेशांचा निचरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या प्रदेशातील गवताळ प्रदेशांवर जंगले वाढू लागली. अगदी अलीकडे, शेवटच्या हिमायुगाच्या अखेरीस रुक्ष आणि थंड हवामानात; सुमारे २१ हजार वर्षांपूर्वी, आणि मध्य-होलोसीन युगाच्या म्हणजे सुमारे ६ हजार वर्षांपूर्वीच्या कोरड्या आणि थंड परिस्थितीत, माणसाचे वास्तव्य त्या भागात असतानाही जंगले टिकून राहिली. तरीही, शेवटच्या हिमयुगात आणि मध्य-होलोसीनच्या दरम्यान दक्षिणेकडील ॲमेझॉन खोऱ्याच्या परिघीय भागांमध्ये, तसेच ईशान्य ॲमेझॉनमध्ये होलोसीनच्या सुरुवातीच्या काळात (सुमारे ११ हजार वर्षांपूर्वी) कदाचित कोरड्या हवामान परिस्थितीमुळे आणि मानवांनी प्रज्वलित केलेल्या आगीच्या प्रभावामुळे सवाना या तृणभूमीचा विस्तार झाला. ॲमेझॉन जीवसंहतीच्या संपूर्ण भागामध्ये, पांढऱ्या-वाळूच्या तृणभूमीचे म्हणजे सवाना असलेले जमिनीचे तुकडेदेखील गेल्या २० हजार ते ७ हजार वर्षांमध्ये विस्तारले आहेत. हे तुकडे प्राचीन नद्यांच्या काठी गाळ साचून आणि अगदी अलीकडे (सुमारे ८०० वर्षांपूर्वी) स्थानिक आगीमुळे तयार झाले आहेत. तथापि, गेल्या ३ हजार वर्षांमध्ये, वाढत्या आर्द्र परिस्थितीमुळे दक्षिणेकडील ॲमेझॉनमध्ये जंगलांचा विस्तार सवानावरही होत आहे. .‘प्रकाशाचा जादूगार’, 'समुद्रदृश्यांचा बादशहा' ये कौन चित्रकार है? .गेल्या ६५ दशलक्ष वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲमेझॉनमधे जंगलाचा ऱ्हास झाला नाही, अशा नोंदी जरी प्राचीन अभिलेखात सापडत असल्या तरी असे दिसते, की तृणभूमी प्रदेश, विशेषतः अधिक हंगामी परिघीय प्रदेशात मानवाकडून वारंवार होणाऱ्या आगी लागण्याच्या घटनांमुळे स्थानिक पातळीवर नक्कीच विस्तारले. भूरूपशास्त्रीय गतिशीलता आणि जंगलातील आगी यामुळे ॲमेझॉनच्या जंगलात पांढऱ्या -वाळूच्या -सवानाचे तुकडेदेखील विस्तारले. भूतकाळातील दुष्काळाचा काळ सामान्यतः वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी असण्याशी संबंधित होता, ज्यावेळी झाडांची पाणी-वापर क्षमता कमी झाली असावी (कारण बाष्पोत्सर्जनाच्यावेळी झाडे कमी कार्बन शोषून घेतात). तथापि, या कालावधीत तापमानही थंड होते, ज्यामुळे झाडांद्वारे पाण्याची मागणी कमी झाली असावी. भूतकाळातील कोरड्या हवामानाची परिस्थिती सध्याच्या हवामान परिस्थितीपेक्षा नक्कीच खूप वेगळी होती.ॲमेझॉन अपरिवर्तनीय अशा चरम बिंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. १९८५ आणि २०२१च्या दरम्यान,ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वर्षावने (Rainforests) आणि इतर स्थानिक वनस्पतींचे क्षेत्र यूकेच्या तिप्पट आकाराने कमी झाले आहे. ॲमेझॉनच्या पर्यावरणावरचा दबाव सतत वाढतो आहे. आपण त्यासाठी आत्ताच कृती करणे आवश्यक आहे. ॲमेझॉनशिवाय आपण हवामान बदलाविरुद्धचा लढा नक्कीच गमावू शकतो. ॲमेझॉनला अनेक गोष्टींमुळे खूप महत्त्व आहे, कारण इथल्या वर्षांवनांवर केवळ अन्न, पाणी, लाकूड आणि औषधांसाठीच नाही, तर हवामान स्थिर ठेवण्यासाठी जगभरातील लोक तसेच स्थानिक पातळीवरही अनेकजण अवलंबून आहेत. ॲमेझॉन वर्षावनामध्ये १५०-२०० अब्ज टन कार्बन साठवला जातो. ॲमेझॉन खोऱ्यातील झाडेदेखील दररोज २० अब्ज टन पाणी बाष्पीभवनामार्फत वातावरणात सोडतात. जागतिक आणि प्रादेशिक कार्बन आणि जलचक्रात हे पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.जंगल कायम ठेवण्यापेक्षा ते तोडणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर आहे, असे वाटणे हीच इथली मुख्य समस्या आहे. आणि तीच या सगळ्या नाशाला कारणीभूत आहे.--------------------.Offbeat Tour : स्वतःच्या कारने फिरण्याचा भारतातला ऑफबीट ट्रेंड!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.