डॉ. बाळ फोंडके
संगीतात उत्तम सूर आणि तालाची जाणीव असण्याला किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तालाच्या बाबतीत तर योग्य वेळी समेवर येणं खासच मानलं जातं. पण बिथोव्हेन तर ठार बहिरा होता. तर मग त्याला सूर आणि बेसूर यातला फरक कसा समजत असेल? तालाच्या बाबतीतही तेच. संगीत तालात आहे की बेताल आहे, याचा उलगडा त्याला कसा होत असेल? का त्याला उपजतच हे साध्य झालं होतं?