Candlelight Concert : शेकडो मेणबत्त्यांच्या सोनेरी मंद प्रकाशात उजळून निघालेले प्रेक्षागृह

Live Music concert : पियानोतून उमटणाऱ्या भान विसरायला लावणाऱ्या, परीकथेत घेऊन जाणाऱ्या सुरावटी –मोझार्ट, विवाल्डी आणि पॉप, रॉक, जॅझसुद्धा. कँडललाइट कॉन्सर्ट्स. सोशल मीडियावरचा संगीताच्या जगातला सध्याचा सर्वात लोकप्रिय ट्रेंड
Candlelight concert in pune
Candlelight concert in pune Esakal
Updated on

शेकडो मेणबत्त्यांच्या सोनेरी मंद प्रकाशात उजळून निघालेले प्रेक्षागृह, वेगवेगळ्या उंचीच्या ‘तेवणाऱ्या’ मेणबत्त्यांनी सजलेल्या पायऱ्यांच्या वर यक्षजळाच्या पोकळीत विसावल्यासारख्या पियानोतून उमटणाऱ्या भान विसरायला लावणाऱ्या, परीकथेत घेऊन जाणाऱ्या सुरावटी –मोझार्ट, विवाल्डी आणि पॉप, रॉक, जॅझसुद्धा. कँडललाइट कॉन्सर्ट्स. सोशल मीडियावरचा संगीताच्या जगातला सध्याचा सर्वात लोकप्रिय ट्रेंड.

गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य संगीत जगताचं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘कॅन्डललाइट कॉन्सर्ट’ या लाइव्ह संगीत-मैफलीचा एक अंक नुकताच पुण्यात सादर झाला. एलइडी कँडल्सचा वापर करत सजवलेल्या प्रेक्षक दालनात झालेल्या या मैफलीमध्ये रसिकांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट साउंडट्रॅक सादरीकरणाचा आनंद लुटला.

जगभरातल्या दीडशेंहून अधिक शहरांमधल्या सादरीकरणांनंतर कँडललाइट कॉन्सर्ट्सचे काही प्रयोग आता भारतात होत आहेत. इमर्सिव्ह कॉन्सर्ट मालिकेत ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या या कॉन्सर्टच्या आधी मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादमधील संगीत रसिकांसाठी कँडललाइट कॉन्सर्ट्स झाल्या होत्या.

भारतातही स्थानिक कलाकारांना सहभागी करून घेऊन उत्कृष्ट शास्त्रीय कलाकृतींपासून समकालीन हिट्सपर्यंत विविध प्रकारच्या संगीताचा अनुभव रसिकांना देत कँडललाइट कॉन्सर्ट्सचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे संयोजक लिव्ह युवर सिटी इंडियाच्या कंट्री मॅनेजर दीपा बजाज यांनी म्हटले आहे.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.