देशातील युवकांना स्वत:चा उद्योग स्थापन करता यावा, यासाठी केंद्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. स्वयंरोजगारातूनच बेरोजगारी दूर होण्याशिवाय संपत्ती निर्मितीलाही हातभार लागू शकतो.
कौशल्यप्राप्त व्यक्ती स्वयंरोजगाराच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले टाकू शकतात. त्यामुळेच गेल्या तीन-चार वर्षांत कौशल्य विकासाच्या विविध योजना आणि उपक्रमांना केंद्रशासनाने गती दिली आहे.
काही योजना या सर्वांसाठीच असल्या तरी समाजातील उपेक्षित आणि तळागाळातील घटकांना सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.