डॉ. विजय पांढरीपांडे
दहावी-बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा सोपा सल्ला आहे. हा प्रयोग आजच करा. एक मोठ्या आकाराचा कोरा कागद घ्या. त्यावर मला काय आवडते? मला भविष्यात काय करायला आवडेल? माझी क्षमता कशात आहे? मला काय आवडत नाही, म्हणजे कठीण वाटते? घरची परिस्थिती कशाला पोषक आहे? अडचणी कुठे येऊ शकतात? या अन् अशा प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तरे लिहा. केवळ एकाच पानावर.