Career In Agriculture: कृषी आधारित उद्योग व्यवसायातील व्यवस्थापन तज्ज्ञ होण्यासाठी करा या अभ्यासक्रमांची निवड
कृषी, अन्नपदार्थ निर्मिती, कृषी व्यवसाय, ग्रामीण आणि तत्सम क्षेत्रासाठी सक्षम आणि समर्थ व्यवस्थापक निर्माण होण्याच्या अनुषंगाने, एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे
कृषीवर आधारित उद्योग/व्यवसाय क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि लखनौसह देशातील काही महत्त्वाच्या संस्थांनी एमबीए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.