Career Option : 50
भारतामध्ये हवाई वाहतुकीच्या वाढीचा वेग विस्मयकारक आहे. भारतातील प्रमुख शहरे विमानसेवेने जोडली गेली आहेत. यामध्ये अधिकाधिक शहरांचा समावेश करण्याचा भारत सरकारने संकल्प केला आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने विमानतळाची उभारणी, विमानाचे लँडिंग-टेकऑफ, मालवाहतूक यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
विमानतळावर विमानाचे उडणे ते उतरणे या सर्व प्रकियेदरम्यान आठ-दहा प्रकारची कार्ये एकाच वेळी सुव्यवस्थितपणे केली जातात. ही कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागते. ही गरज भागवण्याचे काम पुढील अभ्यासक्रम करतात.