Career Option : 2
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्सेस ही आपल्या देशातील आयुर्वेद औषधी निर्मितीशास्त्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था.
या क्षेत्रातील या संस्थेचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने गेल्यावर्षी या संस्थेस इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला असून यापुढे ही संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲण्ड रिसर्च इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्सेस या नावाने ओळखली जाईल.
या संस्थेत आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म), बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म) हे अभ्यासक्रम करता येतात.