Career Option : 35
फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम अशांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर घडवण्याऱ्या विविध संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी चांगले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम करणे आवश्यक ठरते.
डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रातील अनेक लघु आणि दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ह्या अभ्यासक्रमांमुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रासाठी आवश्यक असणारा सैद्धांतिक ज्ञानाचा पाया पक्का होऊ शकतो.