डॉ. पूजा ठाकूरअर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास, सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध आव्हाने आणि संधींचा सामना करण्याची क्षमता निर्माण होते. विद्यार्थ्यांना आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार योग्य क्षेत्र निवडून त्यात उत्तम करिअर घडविता येईल..समाजशास्त्रातल्या विविध शाखांमध्ये अर्थशास्त्राला आधीपासूनच मानाचे स्थान आहे. अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातही उत्तम करिअर घडू शकते याबद्दल बहुतांश लोकांना कल्पनादेखील असते. मात्र गेल्या काही वर्षात एकूणच समाजशास्त्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ज्यांना इतर काहीच जमत नाही अशी मंडळी समाजशास्त्राकडे वळतात या गृहीतकाला कुठेतरी तडा गेला आहे, त्यामुळे अर्थशास्त्र शिक्षणाचाही एक स्पर्धात्मक आणि सर्जनशील शाखा असा प्रवास होताना दिसतो आहे. हे होत असताना, अर्थशास्त्रासारख्या विषयांच्या अभ्यासक्रमात अनेक बदल होऊन वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.अर्थशास्त्राची ढोबळ ओळख मुलांना साधारणपणे इयत्ता आठवीच्या टप्प्यावर होते. कनिष्ठ महाविद्यालयात कला तसेच वाणिज्य शाखेत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्थशास्त्र एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासतात. परंतु या विषयाचे विस्तृत आणि सखोल शिक्षण बारावीनंतर कला आणि समाजशास्त्र शाखांमध्ये शिकणाऱ्या मुलांना घेता येते. अर्थशास्त्राचा अभ्यास करून बी.ए. ही पदवी मिळणे हे प्रचलित आहे. अर्थशास्त्रातील मूळ संकल्पना, सिद्धांत, विविध शाखा यांची ओळख आणि त्याला अनुसरून सैद्धांतिक मांडणी यावर बी.ए.च्या अभ्यासाचा फोकस असतो. याचबरोबर राज्यशास्त्र, इतिहास, संख्याशास्त्र यासारख्या विषयांचा समावेशदेखील अभ्यासक्रमात असतो. विद्यार्थ्यांमध्ये व्यापक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी हे विषय माहीत असणे गरजेचे ठरते. बी.ए.ची पदवी मूलभूत पाया मजबूत करण्यास मदत करते. .अलीकडे अनेक महाविद्यालयांनी बी.एस्सी. इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात मूळ विषयाची ओळख आणि सैद्धांतिक मांडणीसोबत व्यावहारिक आणि उपयोजित ज्ञानदेखील दिले जाते. याचाच भाग म्हणून या अभ्यासक्रमात डेटा विश्लेषण, डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा आर-पायथनसारख्या आधुनिक सॉफ्टवेअर्सचे प्रशिक्षण दिले जाते. तीन वर्षांत पूर्ण होणारा हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता चार वर्षांचा झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना बी.ए., बी.एस्सी. आणि बी.एस्सी.-ऑनर्सबरोबर बी.एस्सी.-रिसर्च अशी पदवी मिळू शकते. या पदवीसाठी शिकत असताना विद्यार्थ्यांना आता संशोधनाचा अनुभवदेखील मिळणार आहे.पदवीपर्यंतचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा आहे तो पदव्युत्तर शिक्षणाचा. यामध्ये एम.ए. आणि एम.एस्सी हे दोन प्रचलित पर्याय आहेत. सध्याच्या काळात बहुतांश संस्था/ विद्यापीठांमध्ये अधिक सखोल आणि विस्तृत शिक्षण देणारा एम.एस्सीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. एम.ए. किंवा एम.एस्सी.चा कोर्स अर्थशास्त्रातील विविध शाखांच्या तपशीलात जाऊन सांगोपांग विचार आणि विश्लेषण करण्यास उपयुक्त आहे. याचबरोबर स्पेशलाइज्ड कोर्स करण्याचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल बिझनेस इकॉनॉमिक्स, फायनान्स, कृषी अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र, ग्रामीण विकास यांसारखे पर्याय निवडून एम.एस्सी. करू शकतो. अर्थशास्त्राची इतर समाजशास्त्रांशी जोड घालून देणारे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. यात वर्तवणूकवादी (Behavioral) अर्थशास्त्र, आर्थिक समाजशास्त्र, आर्थिक मानववंशशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र, भौगोलिक अर्थशास्त्र, ऊर्जा अर्थशास्त्र यांचा समावेश करता येईल. .पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावरही अर्थशास्त्रात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातला एक म्हणजे पीएच.डी.चा अभ्यास. या अभ्यासात पूर्ण भर संशोधनावर असतो. आपल्या आवडीच्या विषयाचा सूक्ष्म अभ्यास करायचा असल्याने यात सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. पूर्णवेळ अभ्यासाचा पर्याय निवडल्यास चार ते पाच वर्षांत पीएच.डी. पूर्ण करता येते. पदव्युत्तर शिक्षणानंतर नेट-जेआरएफ उत्तीर्ण झाल्यास, पीएच.डी.च्या अभ्यासासाठी फेलोशिपदेखील उपलब्ध होऊ शकते. नवीन शैक्षणिक धोरणात पदवी शिक्षणानंतर पीएच.डी. करण्याचा पर्याय सुचवला गेला आहे. मात्र यावर सांगोपांग चर्चा आणि विचार करून पुढे जाणे अधिक योग्य ठरेल, असे वाटते.संशोधनाव्यतिरिक्त पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले, की मॅनेजमेंटचे कोर्सेस हादेखील एक पर्याय विद्यार्थ्यांसमोर असू शकतो. यात एमबीए हा प्रामुख्याने लोकप्रिय कोर्स आहे. याचबरोबर हे शिक्षण घेत असताना यूपीएससी किंवा एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांचीदेखील तयारी करता येते. इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसेसचा पर्याय खास करून अर्थशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अर्थतज्ज्ञ म्हणून सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करता येते.पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षणादरम्यान बँकांच्या परीक्षा देऊन काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड यासारख्या संस्थांमध्ये अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध आहेत. .पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या संधींचा एक ढोबळ आढावा घ्यायचा झाल्यास:शिक्षण क्षेत्र: पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर शिक्षण क्षेत्रात अध्यापन करता येऊ शकते किंवा शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करता येते. बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर बी.एड. पदवी घेऊन शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करता येईल. तसेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची (यूजीसी) नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन अध्यापनदेखील करता येऊ शकते. विद्यापीठांत पदव्युत्तर कोर्सेसचे अध्यापन करायचे असेल तर मात्र अनेक ठिकाणी पीएच.डी. पदवी अनिवार्य आहे. अलीकडेच यूजीसीने पीएच.डी.ची अनिवार्यता रद्द केली आहे तरीही शिक्षण क्षेत्रामध्ये, खास करून काही खासगी विद्यापीठे पीएच.डी.ला प्रेफरन्स देताना दिसतात.खासगी क्षेत्र: खासगी क्षेत्रातदेखील रोजगाराच्या आणि उपजीविकेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रामुख्याने पदव्युत्तर शिक्षणानंतर वित्तीय विश्लेषक, मार्केट रिसर्च अॅनॅलिसिस, व्यवस्थापन सल्लागार म्हणजेच मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा डेटा विश्लेषक अशा वेगवेगळ्या भूमिका अर्थशास्त्राचे विद्यार्थी पार पाडू शकतात. सध्याच्या काळात आर्थिक विश्लेषक आणि आर्थिक सल्लागार हे पद खासगी कंपन्यांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले आहे. या संधीचा फायदा नक्कीच घेता येईल.सरकारी क्षेत्र: पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर सरकारी क्षेत्रातदेखील अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आधी नमूद केल्याप्रमाणे शिक्षण घेता असतानाच इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसेसच्या परीक्षांची तयारी नक्कीच करता येईल. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे क्षेत्र खास करून उपलब्ध आहे. त्याचबरोबर विविध सरकारी संस्थांमध्ये अर्थतज्ज्ञ, धोरण विश्लेषक, सांख्यिकी अधिकारी किंवा एखाद्या सरकारी बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ज्ञ, आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध आहे.बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र: अर्थशास्त्रामध्ये एम.एस्सी करतानाच जर फायनान्स हे स्पेशलायझेशन असेल तर बँकांमध्ये आणि वित्तीय क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक बँकर, वित्तीय नियोजक, क्रेडिट अॅनॅलिस्ट, निधी व्यवस्थापक असे काही पर्याय सध्या खूप लोकप्रिय आहेत. विमा विश्लेषक, विमा सल्लागार, स्टॉक मार्केट विश्लेषक असे पर्यायदेखील निवडता येतील.सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी): सध्याच्या काळात पब्लिक पॉलिसी कोर्सला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठांनी मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी असा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही डिग्री घेतल्यानंतर सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्रांमध्ये सार्वजनिक धोरण विश्लेषक म्हणून नक्कीच काम करता येईल. याव्यतिरिक्त, या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या संधीदेखील उपलब्ध आहेत. संशोधन वैज्ञानिक किंवा संशोधन सहकारी म्हणून विविध संस्थांबरोबर किंवा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करण्याची संधी असते.अनुसंधान आणि विकास: पदवी, पदव्युत्तर आणि खास करून पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर संशोधन क्षेत्रात संशोधन सहकारी, संशोधन वैज्ञानिक, आर्थिक संशोधन विश्लेषक किंवा सल्लागार म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. खासगी, सरकारी आणि स्वायत्त संस्था आपापल्या उद्दिष्टानुसार संशोधन करीत असतात, त्यामुळे आपली आवडीच्या विषयांनुसार अशा संस्थांना जोडून घेता येणे शक्य असते.आंतरराष्ट्रीय संस्था: जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्र किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाही सातत्याने संशोधनाचे काम करत असतात. एखाद्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करणे, त्या संदर्भात माहिती गोळा करणे, डेटा गोळा करणे, विश्लेषण करून योग्य धोरण ठरवणे आणि गाव, शहर तसेच देश पातळीवर त्याची अंमलबजावणी करणे हे सगळे या प्रक्रियेचा भाग असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना इंटर्न, संशोधन सहकारी, संशोधक वैज्ञानिक, सहाय्यक संशोधक ते अर्थतज्ज्ञ किंवा आर्थिक सल्लागार अशा वेगवेगळ्या भूमिका या आंतरराष्ट्रीय संस्था उपलब्ध करून देतात.सामाजिक क्षेत्र: सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातदेखील अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संध्या उपलब्ध होऊ शकतात. धोरण विश्लेषक, प्रकल्प अधिकारी, अर्थ सहाय्यक संकलन अधिकारी, आर्थिक सल्लागार, संख्यांकिक विश्लेषक किंवा संशोधन अधिकारी अशा वेगवेगळ्या भूमिका संस्थेच्या धोरणांनुसार पार पाडता येतील.(डॉ. पूजा ठाकूर पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स येथे साहाय्यक प्राध्यापक आहेत.)-------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.