सोनिया उपासनी
कुठल्याही फॅशन शोसाठी मॉडेल्सची तयारी हा महत्त्वाचा भाग असतो. बॅकस्टेजपासून ते रॅम्पवर वॉक करण्यापर्यंत मॉडेल्सना तयारीसाठी लागणारा काही सेकंदांचा कालावधी, संपूर्ण मेकअप, दिलेले कपडे, केशभूषा या सगळ्याचे व्यवस्थापन करून स्वतःला आणि पर्यायाने डिझायनरला रॅम्पवर सादर करणे हे खरेच आव्हान असते.