Career In Management : व्यवस्थापन क्षेत्रातील पाच वर्षांचे अभ्यास्क्रम; बारावी पास विद्यार्थी करू शकतात अर्ज

नवीन शैक्षणिक धोरणानुसार या पाचही आयआयएमने तीन वर्षानंतर इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सोडून जाण्याची सुविधा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना, बीबीए ही पदवी प्रदान केली जाते
Career In Management
Career In ManagementEsakal
Updated on

Career Option : 26

सध्याच्या काळाशी सुसंगत असणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही संस्था आघाडीवर असते. आयआयएमच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये विविध विषयांचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयआयएमने इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

हे पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. बारावीनंतर ज्याप्रमाणे अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखा, अभिकल्प (डिझाईन) शाखेमध्ये प्रवेश घेता येतो, त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना टेक्नोसॅव्ही आणि स्मार्ट व्यवस्थापकांमध्ये घडवण्याची प्रक्रिया केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com