Career Option : 41अधिकाधिक प्रज्ञावंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गणितातील विविध पैलूंच्या संशोधनाकडे वळावे यासाठी भारत सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाते. तसेच इतर काही महत्त्वाच्या संस्थाही शिष्यवृत्ती व इतर सुविधा देत असतात. .(१) नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स या संस्थेमार्फत गणित विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा गणित विषयात बी.ए. किंवा बी.एस्सी. अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा देणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. याआधी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीसुध्दा या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. पाच वर्षे कालावधीच्या (गणित) इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाचे तिसरे किंवा चौथे वर्षं पूर्ण करणारे विद्यार्थीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांना ६० टक्के गुण मिळायला हवेत. जुलै २०२४पर्यंत गणित विषयातील एम.एस्सी. किंवा एम.ए.च्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतात. मात्र त्यांनाही किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीच्या दोन वर्षासाठी आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दोन वर्षांसाठी दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. .निवड प्रकियाया शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येते. ही परीक्षा साधारणत: ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. परीक्षेचा कालावधी दीड तास. पेपरमध्ये वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी आणि लघु उत्तरे अपेक्षित असलेल्या प्रश्नांचा समावेश असतो. हे प्रश्न पदवीस्तरीय अभ्यासक्रमावर आधारित असतात. मागील वर्षाच्या नमुना प्रश्नपत्रिका www.imsc.res.in/nbhm_model_qusestion/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा मुंबई आणि पुणे येथे घेतली जाते.संपर्क-नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी, अणुशक्ती भवन, सीएसएम मार्ग, मुंबई-४००००१, ईमेल-query@nbhmscholarships.in, संकेतस्थळ-www.nbhm.dae.gov.in(२) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेला डिम्ड युनिव्हर्सिटीचा प्रदान करण्यात आला आहे. या संस्थेने गणित विषयात पीएच.डी. आणि इंटिग्रेटेड एम.एस्सी- पीएचडी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स (math.tifr.res.in) व बंगळूरस्थित सेंटर फॉर ॲप्लिकेबल मॅथेमॅटिक्स (math.tifrbng.res.in) येथे करता येतात. बंगळूरमधील इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्स (math.icts.tifr.res.in) येथेही पीएच.डी. अभ्यासक्रम करता येतो. पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ३१ ते ३५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.इंटिग्रेटेड- पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षी दरमहा २१ हजार रुपये, दुसऱ्या वर्षापासून दरमहा ३१ हजार रुपये आणि पीएच.डी.ला नोंदणी झाल्यावर दरमहा ३५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. .पात्रताः पीएच.डी.- एम.स्टॅट., एम.मॅथ., एम.एस्सी., एम.टेक., एम.ई., एम.ए. (गणित), इंटिग्रेटेड पीएच.डी.- बी.एस्सी., बी.टेक., बी.मॅथ, बी.स्टॅट, बी.ए (गणित). या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- नागपूर, पुणे आणि मुंबई. या परीक्षेनंतर अंतिम निवडीसाठी मुलाखती घेतल्या जातात. गेट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास ज्या परीक्षेत त्यांना अधिक गुण असतील ते गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात.संपर्क- नॅशनल सेंटर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर न्युक्लिअर सायन्स ॲण्ड मॅथेमॅटिक्स, होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई-४००००५, दूरध्वनी-+९१-२२-२२७८२०००, ईमेल-web@tifr.res.in, संकेतस्थळ-tifr.res.in----------------------.Career : करिअर म्हणजे तरी आणखी काय, भवतालाबरोबर चालता चालता छाप सोडणंच ना?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.