Career Option: 19
वैद्यकीय क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. मोठ्या शहरांसह आता ब आणि क श्रेणीच्या शहरांमध्येही कॉर्पोरेट रुग्णालये उभी राहत आहेत. या रुग्णालयांचा मुख्य आधार डॉक्टर हाच असला, तरी आता त्यांच्या साहाय्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज भासते.
वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारच्या विविध सेवा पुरवणाऱ्या कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अभ्यासक्रमांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे.