वाढत्या शहरीकरणामुळे पॅकेजिंग उद्योगाला चालना मिळाली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे आकार, साहित्य, उपयुक्तता या गुणधर्मांसह पॅकेजिंग केले जाते.या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सध्या ग्राहकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे असल्याने होम डिलिव्हरीच्या पॅकेजिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यात सतत वाढ होताना दिसते. त्यासाठी अशा कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरजही वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरू केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.