Career Option : 18
पंचकर्म आयुर्वेदातील एक महत्त्वाची उपचारपद्धती समजली जाते. सध्याच्या धावपळीच्या काळात ताणतणाव आणि जीवनशैलीशी निगडित विविध शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितले जाते.
ही बाब लक्षात आल्याने देश-विदेशात पंचकर्म प्रकिया करण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे (हेल्थ रिसॉर्ट), वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे अशा ठिकाणी करिअरच्या संधी मिळू शकतात.
वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून या उपचारपद्धतीत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींचा समावेश केला जातो. पंचकर्म करणाऱ्या तज्ज्ञांची आणि साहाय्यकांची मागणीही वाढत आहे.