Career Option : 34
भारतातील औषधनिर्मिती उद्योग झपाट्याने वाढत आहे. विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करण्यात भारत आघाडीचा देश ठरला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी भविष्यात विपुल करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
प्रत्यक्ष औषधनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासोबतच या उद्योगाच्या व्यवस्थापकीय, विक्री आणि विपणन या बाजू सांभाळणाऱ्या मनुष्यबळाचीसुद्धा गरज भासेल. त्याअनुषंगाने, एमबीए इन फार्मा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.