Career In styling and Make-up: व्यक्तिमत्त्व फुलवण्याचे कौशल्यतंत्र आत्मसाद केल्यास करियरच्या चांगल्या संधी

ब्रायडल मेकअपचे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण कोणत्याही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता येतात
Career In styling and Make-up
Career In styling and Make-upEsakal
Updated on

Career Option : 28

राजेशाही लग्न सोहळ्यांसारखेच लग्नसोहळे हल्ली सर्वत्र साजरे होताना दिसतात. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ असा एक वाक्प्रचारसुद्धा प्रचलित झाला आहे. या लग्नसोहळ्यांमधला महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रायडल मेकअप. लग्न ठरताक्षणीच ब्रायडल मेकअपचे नियोजन केले जाते. किंबहुना काही कुटुंबांत त्याची तयारी आधीच करून ठेवली जाते.

ब्रायडल मेकअपमुळे वधूच्या सौंदर्याला चार चाँद, आठ सूर्य आणि सोळा तारे वगैरे शंभर टक्के लागतातच. विवाहाच्या निमित्ताने विशेष सजून मांडवात येणारी वधू सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असते. हे ब्रायडल मेकअप आर्टिस्टचे कौशल्य असते. एखाद्या राजकुमारीसारख्या अशा लुकसाठी चांगला खर्च करण्याचीही हौशी मंडळींची तयारी असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.