Career In Textile : वस्त्रनिर्मितीचेही आहे शास्त्र.! ही कला कशी शिकाल? अभ्यासक्रम कोणते?

या क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळाची सातत्याने गरज भासत असते. ही गरज भागवण्यासाठी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्स्टाईल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली आहे
Career In Textile
Career In Textile Esakal
Updated on

Career Option : 36

पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. वस्त्रोद्योग सर्व प्रांतांत पसरलेला असून या क्षेत्राद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळाची सातत्याने गरज भासत असते. ही गरज भागवण्यासाठी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्स्टाईल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली आहे.

ही संस्था केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी आपल्या देशातील महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत वस्त्रोद्योग निर्मिती, व्यवस्थापन व्यवसायासंदर्भातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.