Career Option : 37
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स यांच्या अहवालानुसार नजीकच्या भविष्यात भारतात या क्षेत्रात जवळपास तीन कोटी रोजगार संधी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन भारतातील काही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी या विषयाशी निगडित, वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.