डॉ. श्रीराम गीतकाय शिकायचं? कधी शिकायचं?? आणि त्याचं करायचं काय??? या तीनही प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडली आहेत त्याची करिअरची पहिली पायरी चढून झाली आहे, असे समजता येईल. करिअरमध्ये आनंद हवा, छंदाची करिअर करता आली तर त्या सारखा दुसरा आनंद नाही..एकेक शब्द असे असतात, की पाहता पाहता जिभेवर रुळतात आणि मग त्याला आपल्या मातृभाषेत काय म्हणतात हेसुद्धा आपण विसरून जातो किंवा त्याला प्रतिशब्द सापडतच नाही. करिअर हा असाच एक. सहजगत्या तुम्हाला असे अनेक शब्द आठवतील. ज्यावेळी करिअर शब्द कोणी वापरत नव्हते तेव्हापासून मी या क्षेत्रात काम करतोय. विश्वास नाही ना बसत, मी काय म्हणतोय त्याच्यावर? १९९३मध्ये माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. त्यांची नावे होती डॉक्टरच व्हायचंय, इंजिनिअरच व्हायचंय, आर्मी जनरल व्हायचंय. त्या तिन्ही पुस्तकात करिअर शब्द माझा मलाच सापडत नाही. पण गेली वीस वर्षं मला कोणी विचारलं की तुम्ही काय करता? तर मला सांगावं लागतं, मी करिअर काउन्सिलर आहे. तसा मी मूळचा डॉक्टर होऊन झाली चोपन्न वर्षं. तीस-पस्तीस वर्षं फक्त प्रॅक्टिस केली. तसं अजूनही कोणी विचारलं तर त्यातला सल्ला देतो. लेखक बनलो तो नंतर. तेव्हापासून आजपर्यंत माझी वीस पुस्तके आली असतील. माझ्या व्हिजिटिंग कार्डवर मी कायमच लिहीत आलोय, ‘लेखक, डॉक्टर आणि करिअर काउन्सिलर’. साप्ताहिक सकाळच्या संपादकांनी या विषयावरच लेख लिहायला सांगितला म्हणून हे सगळे माझ्याबद्दलचे रामायण सहसा कोणाला सांगायला न जाणारा मी, आज माझा मलाच प्रश्न विचारतो, की माझे करिअर कशात?बदलत्या भूमिकेत रोजएखाद्या दिवशी मला फोन येतो. ओळखदेख असतेच असेही नाही. बोलणारा पहिलंच वाक्य बोलतो, ‘तुमच अमुक पुस्तक मी वाचलं, ते मला खूप आवडलं.’ त्यावेळी मी त्याच्याशी बोलण्यात खूप रंगून जातो. कारण तो माझा वाचक असतो. मी त्याची माहिती विचारतो, ‘काय करतो? कुठे असतो? हे पुस्तक कसं मिळालं? ते तू का वाचलं आहेस?’ अशा प्रश्नांचा माझा भडिमार त्याच्यावर सुरू होतो. म्हणजे त्या क्षणी मला माझ्या पुस्तकाचे कौतुक ऐकण्याऐवजी माझ्या वाचकात जास्त रस असतो.अशा दहा मिनिटे तरी गप्पा होत राहतात. शेवटी चुकूनमाकून तो वाचक मला विचारतो, ‘तुम्ही काय करता? कुठे असता?’ तेव्हा लगेच मी माझ्या सध्याच्या भूमिकेत जातो आणि उत्तर देतो, ‘मी करिअर काउन्सिलर म्हणून कामात असतो. माझी अनेक विषयावरची पुस्तके आहेत.’ त्यांनी वाचलेले पुस्तक समजा वैद्यकीय विषयावर असले किंवा शास्त्रातील विषयावरचे असले तर तो एकदम चमकतो आणि म्हणतो, ‘अरेच्चा ते करिअरवर लेख लिहिणारे तुम्हीच का?’ त्याला मी ‘हो’ म्हणून उत्तर देतो पण माझा त्याच्यातला पुस्तकाचा वाचक म्हणून रस कमी झालेला असतो. काही वेळा बोलणे रेंगाळते. पण सहसा मी आटोपते घेतो. कारण त्याच्या फोनमुळे मी लेखकाच्या भूमिकेत गेलेलो असतो. हा फोन त्या भूमिकेला सुखावणारा असतो. हे माझे म्हणणे फक्त एखाद्या लेखकालाच समजू शकेल. .पेशंटचा फोनपण हाच फोन मला, ‘डॉक्टर आहेत का?’ म्हणून आला तर माझी भूमिका संपूर्णपणे बदलते. ‘काय होतंय,’ असे स्वाभाविकपणे तोंडून नकळत येते. आता वेगळेच करिअर सुरू झालेले असते. फक्त तो संवाद जेवढ्यास तेवढे अशा स्वरूपातच राहतो. फोन करणाऱ्या रुग्णाच्या शंका संपल्या, की मी फोन ठेवून देतो. सहसा रुग्ण बरा झाल्यावर कधीही, ‘मी बरा झालो’, म्हणून डॉक्टरला सांगायला जात नाही, हे मला पक्के ठाऊक असते. पण औषध घेऊन बरा झाला नाही तर मात्र तो माझी मानगूट पकडायला येणार आहे, याची मला छान कल्पना असते. अशा वेळेला काय करायचे असते ते आता मला पन्नास वर्षांच्या अनुभवाने, डॉक्टर म्हणून केलेल्या करिअरमधून छान कळलेले आहे. नकळतपणे आणि सराईतपणे मी दुसऱ्या भूमिकेतील करिअरमधून बाहेर पडतो. हे जे काही मी लिहिले आहे ते कोणत्याही अनुभवी डॉक्टरला सहजपणे कळेल, आवडेल. कारण त्याला त्या करिअरची छान ओळख असतं.पालकांचा फोनया प्रकारच्या फोनमधला आवाज साशंक असतो, ‘तुम्ही ते करिअरबद्दलचा सल्ला वगैरे देता ना?’ स्वतःच्या मुलाच्या भविष्याबद्दल बोलताना; चौकशी करताना नकळत एक अस्वस्थपणा, साशंकता आवाजात डोकावत असते. त्याचे कारण अगदी स्वाभाविक असते. स्वतःची राहिलेली स्वप्ने मुलांकडून पुरी करून घेण्याची इच्छा आणि मुलांनी स्वतःपेक्षा जास्त मोठ्ठे व्हावे ही किमान अपेक्षा त्यामागे नकळत असते. या फोनला उत्तर देताना सहजपणे मी माझ्याही नकळत माझ्या सध्याच्या भूमिकेत जातो करिअर काउन्सिलरच्या.मग माझे करिअर कोणते?यातील कोणतीच भूमिका मला वठवावी लागत नाही. मग असे म्हणायचे का मी ही तीन करिअर केली? मला तसे वाटत नाही. या तीनही भूमिका मी मुख्यतः माझ्या कामाचा भाग म्हणून करत आहे. याचे कारण साधसे आहे. डॉक्टरी व्यवसायात असताना अनेकांसारखा मी एक डॉक्टरच होतो. स्वतःच्या डॉक्टरी व्यवसायात प्रवेश करणाऱ्यांना मला काहीतरी आतून सांगावसे, खूप लिहावसे वाटत होते. म्हणूनच मी माझे पहिले पुस्तक लिहिले, डॉक्टरच व्हायचंय. ते वाचून माझे दोन इंजिनिअर मित्र म्हणाले, ‘अरे आमच्याही बाबतीत तसंच घडतं आहे, त्यावर तू का लिहीत नाहीस?’ म्हणून आले दुसरे पुस्तक, इंजिनिअर व्हायचंय. कॉलेजात शिकत असताना आर्मीच्या संदर्भात खूप आकर्षण माझ्या मनात होते. एवढेच नव्हे तर भारतातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सैन्यदलांबद्दल सखोल माहिती व्हावी म्हणून सुरू केलेल्या पहिल्या आर्मी अटॅचमेंट कॅम्प नावाच्या महिनाभराच्या सैन्यदलातील मेडिकल बटालियनबरोबरच्या वास्तव्यात माझा सहभाग होता. या अनुभवावर तिसरे पुस्तक आले, आर्मी जनरलच व्हायचंय. या पुस्तकांच्या वाचकांनी मला करिअर काउन्सिलिंगकडे खेचले असे मी म्हणेन. अनेक ठिकाणी या करिअरविषयी व्याख्याने द्यायला व नंतरची प्रश्नोत्तरे विचारायला माझ्या वाचकांनी मला प्रवृत्त केले, हे मला ठाऊक आहे.तसेच माझी पुस्तके वाचून काही प्रकाशकांनी त्यांच्याकडील, त्यांच्या मनातले विषय मला सांगितले व माझ्याकडून लिहून घेतले. विषयानुरूप पुस्तके होत गेली. संख्या वाढत गेली आणि मला सुखावणारा शब्द, ‘लेखक’, मी माझ्या नावापुढे लावायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी तीन अवतारात आज तुमच्यासमोर आहे. पहिला अवतार होता डॉक्टरचा. पण तो झाला दुय्यम आणि सध्याचा अवतार करिअर काउन्सिलर हा राहिला शेवटी.करिअर समजून घेतानाआता आपण करिअर या शब्दाच्या सगळ्या छटांकडे पाहिले तर आठवी-नववीतील मुले-मुलीसुद्धा आई-वडिलांना सांगताना दिसतात, ‘मला ना, याच्यातच करिअर करायचे आहे’. म्हणजे काय हे मुलांना माहिती नसते. विचारले तर सांगता येत नाही, पण ते करिअर काय आहे या शब्दामागे भांबावून पालक अस्वस्थ होतात. जसे काही मुलगा चॉकोलेट मागत आहे आणि आपण ते देऊ शकत नाही असा हा अस्वस्थपणा असतो. एखादा अत्यंत हुशार, वर्गात कायम पहिला येणारा विद्यार्थी एखादी व्यावसायिक पदवी हातात घेतो आणि त्यानंतर त्या क्षेत्रात मला काम करायचेच नाही, कारण मला त्यात रस वाटत नाही, असे उघडपणे आई-वडिलांना किंवा मला सांगतो तेव्हा करिअरचा खरा अर्थ सुरू होतो....काय शिकायचं? कधी शिकायचं?? आणि त्याचं करायचं काय???या तीनही प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडली आहेत त्याची करिअरची पहिली पायरी चढून झाली आहे, असे समजता येईल. मग सध्या करिअर शब्दाला जोडलेले पोटशब्द सगळेच्या सगळे ओघानी चालून येतात. ते आपल्याला सहज आठवतील.करिअरमध्ये आनंद हवा, छंदाचेच करिअर करता आले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आवडते काम करताना कधीही कंटाळा येत नाही आणि नावडते काम कोणी करू नये. आयुष्यात दोन-तीनवेळा वेगवेगळी कामे करावी लागतात. ती आवडीचीच निवडावीत, आवडीचे काम करताना यश चालत येते...अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या मनातील विविध छटा, करिअर शब्दापाठोपाठ घडाघडा बोलणारे अनेक लोक आहेत. प्रत्येक शहरात करिअर फेअर दरवर्षी होते, प्रत्येक वृत्तपत्रात करिअरबद्दल माहिती येते आणि घराघरात करिअरची चर्चा होते. असा हा सारा करिअरचा गलबला २०००च्या आधी कोणालाच फारसा माहीत नव्हता, असे आता सांगितले तर? पण वास्तव तेच आहे.गेल्या पंधरा वर्षांत करिअर शब्दाला चिकटलेल्या अजून तीन-चार गोष्टी आहेत, त्या फारच धोकादायक ठरत आहेत. या करिअरमध्ये कितीचे पॅकेज मिळते? हे शिकले तर मला सीईओची पोझिशन कधी मिळेल? या करिअरमध्ये परदेशात जाण्याची संधी आहे का नाही? अमेरिकेत करिअर करण्याकरता काय शिकावे लागते? काय शिकले तर ऑस्ट्रेलियामध्ये छान करिअर होते? आणि दहावीत जेमतेम बऱ्या गुणांनी पास झालेला मुलगा ज्यावेळी असे प्रश्न मला विचारतो आणि आई-वडील कौतुकाने त्याच्याकडे पाहतात, तेव्हा मी निरुत्तर झालेलो असतो.मी सतत प्रगती करतो आहे का? प्रगती करत असताना मी पुढचे टप्पे गाठतो आहे का? प्रगती आर्थिक यशाशी जोडायची नसते,एवढे तरी मला कळले आहे का? या वाटचालीत मी स्वतः समाधानी आहे का?या साऱ्याची होकारार्थी उत्तरे असली तर तुमचे करिअर नक्की झाले. मग इतरांकडून कौतुक वाट्याला येते.(डॉ. श्रीराम गीत लेखक, करिअर काउन्सिलर आहेत.)-----------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.