-किशोर पेटकर
जागतिक टेनिसमध्ये नदालनंतर स्पॅनिश टेनिसचा झेंडा कोण फडकावणार या प्रश्नाचेही उत्तर अल्काराझ देत आहे. कारण, २१व्या वर्षी या हरहुन्नरी, तरण्याबांड टेनिसपटूने तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. नदालप्रमाणे उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्याला अजून खूप मजल मारायची आहे, तरीही अल्काराझचा आश्वासक आणि प्रगल्भ खेळ अपेक्षा उंचावणारा आहे.