संभाजी गंडमाळे
कोल्हापूर आज विविध क्षेत्रात भरारी घेत असले तरी इथे पारंपरिक रांगडी संस्कृती आणि त्यातून जगण्याचा उत्सव नित्यनेमाने साजरा होतो. आजही म्हशींची, बैलगाड्यांची, कबुतरांची शर्यत इथे रंगते आणि कोल्हापुरी रग असणारे कुस्ती, फुटबॉल हे खेळही तितक्याच ईर्षेने खेळले जातात. सण, उत्सव असोत वा परंपरा, तुम्हाला कोल्हापूरच्या ‘जिंदादिल’ स्वभावाचा प्रत्यय येणारच.