सुधीर फाकटकरसंस्थेत कृषी, जैवविज्ञान तसेच संबंधित अभियांत्रिकीतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तसेच त्यापुढे कंदवर्गीय पिकांसंबंधी विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची सुविधा आहे..सन १९५३मध्ये केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये असलेल्या त्रावणकोर विद्यापीठात कंदवर्गीय पिकांचे प्राथमिक संशोधन सुरू झाले होते. पुढे दशकभराच्या कालावधीत या संशोधनाचा विस्तार होत गेल्यामुळे १९६६मध्ये या संशोधनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत स्वतंत्र संस्था निर्माण झाली. आरंभी एका भाडेतत्वावरील इमारतीत या संस्थेचे कार्य सुरू राहिले. पुढे १९७२मध्ये तिरुअनंतपुरममध्येच पन्नास एकर जागेतील स्वतंत्र आवारात ही संस्था ‘केंद्रीय कंदवर्गीय पिके संशोधन संस्था’ म्हणून स्थलांतरित झाली. दरम्यान आपल्या देशात कंदवर्गीय पिकांचा विस्तार रताळे, साबुदाणा तसेच बटाटा या पिकांपासून बीट, याम, टारो या वर्गांमधील आणखी काही पिकांपर्यंत झाला होता. म्हणूनच भारतासारख्या उष्णकटीबंधीय प्रदेशात कंदवर्गीय पिकांसंदर्भात मुलभूत आणि उपयोजित संशोधन करण्याचे, तसेच संशोधित विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ध्येय या संस्थेने समोर ठेवले आहे..संशोधनासाठी या संस्थेत कंदवर्गीय पिकांचे उत्पादन, सुधारणा, संरक्षण आणि उपयोजन हे मुख्य विभाग केले आहेत. हे सर्व विभाग अद्ययावत प्रयोगशाळांनी समृद्ध आहेत. याशिवाय कंदवर्गीय पिकांशी संबंधित वापरकर्त्यांसाठी समाजशास्त्र हा खास विभागही आहे.कंदवर्गीय पीक उत्पादन विभागात विविध वाणांचे कंद जोमाने वाढण्यासाठी माती परीक्षण, खते आणि अन्य पौष्टिक घटक वापराचे प्रमाण, कीटकनाशक वापराचे व्यवस्थापन इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. कंदवर्गीय पिकांचा दर्जा उंचावण्यासाठी सुधारणा विभाग जनुकीय संशोधनातून कार्य करतो.सुधारणा विभागाने आजपर्यंत कंदवर्गीय पिकांच्या साडेपाच हजार जनुकीय नमुन्यांचे संकलन केले आहे. भारतीय हवामानात भरघोस उत्पादन देणारे सत्तर नवीन वाण विकसित केले आहेत. याखेरीज कंदवर्गीय पिकांच्या आजारांवरही या विभागाने विशेष संशोधन केले आहे.उपयोजन विभागाने कंदवर्गीय पिकांच्या लागवड पद्धती सुलभ करण्यापासून या कंदांचे तुकडे करणे, रस काढणे या साध्या प्रक्रियांपासून या पिकांपासून इथेनॉल, शर्करा तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे..शिक्षणासंदर्भात या संस्थेत कृषी, जैवविज्ञान तसेच संबंधित अभियांत्रिकीतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तसेच पीएच.डी. करण्याचीही सुविधा आहे. कृषी विषयातील विद्यार्थ्यांनाही येथे कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध आहेत.कंदवर्गीय पिके म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बहुतेक वेळा फारसे महत्त्व नसलेले खाद्यान्न एवढेच येते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. कंदवर्गीय पिकांच्या माध्यमातून औषधांसाठीचे कच्चे पदार्थ तसेच उद्योग, व्यवसायांमध्ये आवश्यक असलेले इथेनॉल, स्टार्च असे अनेक घटक येतात.वाढत्या औद्योगिक विस्तारानुसार विविध रासायनिक घटकांची गरज वाढत आहे. असे घटक मिळवण्यासाठी कंदवर्गीय पिके उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. बदलत्या कालखंडात कंदवर्गीय पिकांच्या माध्यमातून संबंधित उत्पादने घेणाऱ्या शेतकरी, व्यावसायिकांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मोठीच संधी मिळत आहे.(सुधीर फाकटकर ‘टीआयएफआर’ संस्थेच्या महाकाय मीटर तरंगलांबी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) वेधशाळेतील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ आहेत.)-------------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.