नेहा काडगांवकर
चमचमीत चकल्यांशिवाय फराळ अपुरा असतो. वर्षभरात वेगवेगळ्या निमित्तानं जरी चकल्या खाल्ल्या जात असल्या, तरी दिवाळीतल्या फराळाला चकल्या लागतातच. या दिवाळीत काही वेगळ्या चवीच्या चकल्या करून बघा..
वाढप
अर्धा किलो चकल्या (साधारण २५- ३० चकल्या)
साहित्य
एक वाटी मुगाची डाळ, ४ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी गरम तेल, १ चमचा धने, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तिखट, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार, २ चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, गरम पाणी, चकल्या तळण्यासाठी तेल.