डॉ. अनिल लचके
अंतोनी लव्हाझिए, कार्ल शीले आणि जोसेफ प्रिस्टले यांनी प्राणवायूवर केलेल्या संशोधनाने आधुनिक रसायनशास्त्राच्या उदयाला चालना दिली, असं मानलं जातं. प्राणवायूच्या शोधानंतरच्या अडीचशे वर्षात मानवाचे जीवन सुखी-समाधानी व्हावे म्हणून रसायनशास्त्राने मोलाची कामगिरी बजावली आहे.