मेट्रो ‘झुकझुक-बिकझुक’ आवाज करत नाही, धूर-बीर काहीही नसतो... उलट एसी असते... मस्त जाते... झूऽऽऽम... काचेला नाक लावून सगळं शहर बघायचं... फक्त झाडांच्या ऐवजी शहरातल्या इमारती मागे मागे पळतात, त्या बघाव्या लागतात! निसर्ग कुठून दिसणार? तो बघायला शिबिरांच्या अन् क्लासेसच्या बिझी टाइम टेबलपुढे ट्रेन किंवा एस्टीने गावाला कुठले जाणार? त्यापेक्षा शाळेचं टाइम टेबल परवडलं!