सुजाता नेरुरकर
दिवाळी जवळ आली की सगळ्या महिलांना फराळ करायचा खूप उत्साह असतो. मग आपण फराळाच्या वेगळ्या काही रेसिपीज मिळतात का ते शोधत राहतो. फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, करंजी, अनारसे, चिवडा असे बरेच प्रकार आहेत. प्रत्येकाची पद्धत व चव वेगळी. दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी चला तर मग बघूया खमंग चिवड्याचे काही प्रकार.
साहित्य
तीन कप चुरमुरे (ताजे), मीठ व पिठीसाखर चवीनुसार.
फोडणीसाठी
दोन टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, ७-८ कढीपत्ता पाने, ५-६ लसूण पाकळ्या (चिरून), २ हिरव्या मिरच्या (चिरून), २ टेबलस्पून शेंगदाणे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट.
सजावटीसाठी ः
पाव कप बारीक शेव, पाव कप कोथिंबीर, १ छोटा कांदा (बारीक चिरून), १ छोटा टोमॅटो (बारीक चिरून), लिंबू चवीनुसार.